Thackeray Vs Shinde : राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निर्णय पुन्हा लांबणीवर, आता २२ ऑगस्टला होणार सुनावणी

शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवले आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. आता यावरील सुनावणी १२ ऑगस्टला होणार होती ती आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता यावरील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे.

ठाकरे वि. शिंदे
thackeray vs shinde  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवले आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.
  • यावरील सुनावणी १२ ऑगस्टला होणार होती
  • आता यावरील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे.

Thackeray Vs Shinde : नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना नेते (Shivsena Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली आणि शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thakckeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas aghadi Government) कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजपचे (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची (Deputy CM) शपथ घेतली. या विरोधात शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवले आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेले. आता यावरील सुनावणी (Hearing) १२ ऑगस्टला होणार होती ती आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता यावरील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे. (maharashtra political crisis hearing postponed on 22nd august 2022 supreme court)

अधिक वाचा :  शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पुढचा टप्पा कधी अन् कुणाला मिळणार संधी? वाचा

     
शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली आहे. तर व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी शिंदे गटाने शिवसेनेच्या १४ आमदारांवर कारवाई केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला असून शिवसेनेच्या धनुष्यबाणावरही आपला हक्का सांगितला आहे. या प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यायालया सुनावणी सुरू आहे. आधी १२ ऑगस्टला यावर सुनावणी होणार होती. आता पुन्हा या खटल्याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता २२ ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे.  

अधिक वाचा :  Sanjay Rathod यांना मंत्रिपद दिल्याने चित्रा वाघांची 'डरकाळी' पाहून सेनेने साधली संधी अन् दिली खुली ऑफर


शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

आम्ही दहा दिवसांसाठी सुनावणी पुढे काय ढकलली त्यावर तुम्ही सरकार बनवले अशा कानपिचक्या सरन्यायाधीश एन.व्ही.रामण्णा यांनी शिंदे गटाला दिल्या होता. आताही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राज्यात शिंदे-फडणवीस गटाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यात शिंदे गटातील संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या वादग्रस्त आमदारांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे. तर भाजपमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनंगटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे.  

अधिक वाचा :  Cabinet: शिंदे-फडणवीसांचं पुरुषप्रधान मंत्रिमंडळ, एकाही महिला आमदाराला स्थान नाही

२७ तारखेला रामण्णा होणार निवृत्त

सध्याचे सरन्यायाधीश एन.व्ही.रामण्णा हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहे. तर २७ तारखेपासून उमेश लळीत हे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील. आता राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल एन.व्ही.रामण्णा यांच्या कारकीर्दीत मिळणार की उमेश लळीत यांच्या कारकीर्दीत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अधिक वाचा :  Chitra Wagh: संजय राठोडांना मंत्रिपद, भाजपच्या चित्रा वाघ प्रचंड संतापल्या; म्हणाल्या...

संजय राठोड यांच्याविरोधात लढा

पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना आमदार संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. तेव्हा भाजपच्या चित्रा वाघ यांनी राठोड यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. आता राठोड शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले आहेत. संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणे ही चुकीचे असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. तसेच संजय राठोड यांच्याविरोधात आपला लढा सुरूच राहील असेही वाघ म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी