Maharashtra Political Crisis hearing in SC live updates: राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू आहे. 14 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या सुनावणी वेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर बुधवारी (15 फेब्रुवारी 2023) शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Harish Salve) यांनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला.
14 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास चार तास युक्तीवाद केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे वकील आपला युक्तीवाद करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार म्हणजेच 16 फेब्रुवारीचा दिवसही राखीव ठेवला आहे. त्यानुसार आता सत्ता संघर्षाची सुनावणी गुरुवारी (16 फेब्रुवारी 2023) पुन्हा होणार आहे.
हे पण वाचा : रात्री न जेवल्याने वजन कमी होते का?
हे पण वाचा : तुम्ही सुद्धा पोटावर झोपता? होऊ शकतात हे नुकसान
सरन्यायाधीशांनी म्हटलं, हा मुद्दा केवळ चर्चात्मक मुद्दा नाही. जर राज्यपालांकडून कुठलाही निरोप नसता तर ठाकरेंचा राजीनामा झाला नसता. त्यांच्याकडे आवश्यक बहुमत नसल्याने त्यांनी राजीनामा दिला.
एका पक्षात एखाद्या नेत्याने विश्वास गमावला की नाही याबाबतचा मुद्दा असला तरी तो नेता पुन्हा आपल्या पक्षावर प्रभूत्व मिळवू शकतो. अशा स्थितीत पॉलिटिकल स्टेटेस्को जर मिळाला असता तर परिस्थिती बदलली असती का.
हे पण वाचा : स्वप्नदोषाच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे ट्राय करा
नीरज कौल यांनी युक्तीवाद करताना म्हटलं, केवळ एका नेत्याला हटवू शकत नाही म्हणून तुम्ही पक्षांतरबंदीच्या कायद्याच्या अंतर्गत हे प्रकरण येतं असं म्हणणं योग्य नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत, आमच्याकडे बहुमत आहे असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांची उद्धव ठाकरेंवर नाराजी होती. उद्धव ठाकरे यांच्यावरील विश्वास उडाला होता. अशा पक्षांतर्गत नाराजीचा विचार व्हायला हवा असंही नीरज कौल यांनी युक्तीवाद करताना म्हटलं.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं, नबाम रेबिया प्रकरण बाजुला ठेवून या प्रकरणाकडे पाहुयात.
शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी म्हटलं, ज्या नेत्यावर आमदारांना विश्वास नाही तो नेता मुख्यमंत्रिपदावर कसा?. यावेळी नीरज किशन कौल यांच्याकडून किहोतो प्रकरणाचा दाखला सुद्धा देण्यात आला.