Uddhav Thackeray यांची चूक भोवणार? Eknath Shinde गटाला दिलासा मिळणार

Uddhav Thackeray vs Eknath Shinde camp case in SC: शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत सर्व पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. 

maharashtra political crisis uddhav thackeray this mistake may create problem read details
Uddhav Thackeray यांची चूक भोवणार? Eknath Shinde गटाला दिलासा मिळणार 
थोडं पण कामाचं
  • बंडखोर अपात्र आहेत हे गृहित धरून ठाकरे गटाचा युक्तिवाद
  • मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवं सरकार स्थापन झालं
  • ज्यांनी पक्ष सोडला असेल त्यांच्यावरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो - शिंदे गटाकडून हरीश साळवे यांचा युक्तिवाद

Uddhav Thackeray vs Eknath Shinde group: एकनाथ शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांवर अपात्रेची कारवाई संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वच पक्षांकडून जोरदार युक्तिवाद झाला. शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यापैकी १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. जवळपास एक तासाहून अधिक काळ कोर्टात युक्तिवाद झाला. या प्रकरणी आता पुढील सुनावणी उद्या होणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेली चूक शिवसेनेसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra political crisis uddhav Thackeray this mistake may create problem read details)

नेमकं काय घडलं कोर्टात? 

एकनाथ शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. महेश जेठमलानी यांनी म्हटलं, समोरील पक्षाचा युक्तिवाद हा अपात्रतेच्या आधारित आहे. पण हा चुकीचा कसा आहे हे जेठमलानी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. महेश जेठमलानी यांनी म्हटलं, निवडणूक आयोगाने या प्रकरणात कोर्टाने थांबवू नये, निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू रहावी.

कारण, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला चिन्ह मिळालं तर तो शिंदे गटासाठी हा एक विजय असेल. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टातील काही गोष्टी सुद्धा शिंदे गटासाठी सोप्या ठरू शकतात.

अधिक वाचा : Uday Samant यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'गाडीवर दगड मारुन....'

महेश जेठमलानी यांनी पुढे म्हटलं, महाराष्ट्रात आलेलं हे नवीन सरकार आम्ही विरोधात मतदान केल्याने आलेलं नाहीये. तर, उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी बहुमताच्या चाचणीला सामोरे जाण्यासाठी नकार दिला. याचा अर्थ असा होत नाही की, त्यांना बहुमताच्या संदर्भातील आरोप आमच्यावर होऊ शकत नाही असं शिंदे गटाकडून म्हटले गेले आहे. मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरे गेलेच नाही तर आमच्यावरील आरोप हे लागू होत नाहीत आणि अयोग्य आहेत असाही शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. 

उद्धव ठाकरेंकडून चूक

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं ही चूक झाली का? कारण जर राजीनामा दिला नसता आणि बहुमत चाचणीवेळी शिंदे गटाने आपल्याच पक्षाच्या नेत्याविरोधात मतदान केलं, आपल्याच पदाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपदावरुन खाली उतरायला भाग पाडलं हा मुद्दा पक्षविरोधी कारवाईसाठी सबळ पुरावा ठरला असता.

ठाकरे सरकारची दुसरी चूक?

शिंदे गटाकडून दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला होता. तो म्हणजे, ठाकरे सरकारने वर्षभर पूर्णवेळ विधानसभा अध्यक्षांची निवड केली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवं सरकार स्थापन झालं. त्यानंतर नव्या सरकारने तातडीने नवा अध्यक्ष निवडला. १५४ विरुद्ध ९९ इतक्या बहुमताने विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी