महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक मेडिकल ऑक्सिजन; नॉन स्टॉप 'Oxygen Express' ने होईल वाहतूक

राज्यात कोरोना संकट वाढत असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप ठाकरे सरकारने केल्यानंतर आता रेल्वे मंत्रालय कामाला लागले आहे.

Maharashtra to get biggest share of medical oxygen
महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक मेडिकल ऑक्सिजन  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • दिवसाला ऑक्सिजनचा वापर ४ हजार ७९५ मेट्रिक टन
  • ११० टक्क्यापर्यंत ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार
  • महाराष्ट्राला 'ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन'ने मिळणार प्राणवायू

नवी दिल्ली : राज्यात कोरोना (Corona) संकट वाढत असताना केंद्र सरकार (Central Government) मदत करत नसल्याचा आरोप ठाकरे सरकारने केल्यानंतर आता रेल्वे मंत्रालय (Ministry of Railways) कामाला लागले आहे. महाराष्ट्राला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये, यासाठी रेल्वे विभाग 'ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन' (Oxygen Express Train) चालवणार आहे. यातून १,५०० मेट्रिक टन ऑक्सिजन (Oxygen) महाराष्ट्राला दिला जाणार आहे.  याविषयीच माहिती वाणिज्य व उद्योग मंत्री व रेल्वे मंत्री (Minister of Commerce and Industry and Minister of Railways) पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी रविवारी माध्यमाशी बोलताना दिली. 

केंद्र सरकारकडून मॅपिग केल्यानंतर या ऑक्सिजन एक्स्प्रेससाठी एक ग्रीन कॉरिडोअर बनवण्यात आले आहे. ग्रीन कॉरिडोअरमुळे महाराष्ट्रापर्यंतची वाहतूक सुरळीत होणार आहे.  दरम्यान,देशभरात कोरोनाचं संकट वाढलेले  असून  महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटावी  यासाठी राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लावला आहे. परंतु कोरोना रुग्णांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.  राज्यातील रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाहीत. तर कुठे ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार दररोज येत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी करणारे रेमडिसिविर इंजेक्शनचाही राज्यात तुटवडा जाणवत आहे. यासर्व परिस्थितीवर राज्यातील सरकारने केंद्राकडे बोट दाखवून  केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. यावर आता रेल्वेने दखल घेत महाराष्ट्राला मदत करण्यासाठी कंबर कसली आहे.

रविवारी एका मुलाखती बोलताना रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की,  'मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढावा, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.  कोरोनामुळे प्रभावित झालेल्या १२ राज्यांना आणि केंद्र शासित राज्यांसोबत केंद्राने  बैठक घेऊन या राज्यांना ६ हजार १७७ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी मॅपिंग केले आहे'. 'केंद्र सरकार राज्य सरकरांबरोबर खांद्याला खांदा लावून कोरोना विरुद्धात लढत आहे.  कोविड १९  हे संकट कोणालाच अपेक्षित नसल्याचं गोयल म्हणाले.  महाराष्ट्र, दिल्ली, आणि इतर राज्यांमध्ये कोविड -१९ चे संकट हे नियंत्रणाच्या बाहेर गेले असल्याचेही ते म्हणाले.  

वेगवेगळे मंत्रालय आणि केंद्र सरकारचे वेगवेगळे विभाग प्रत्येक दोन दिवशी १२ राज्यांशी बैठका घेतील. कोणताही दुजाभाव न करता  कोणत्या राज्याला किती ऑक्सिजन हवा, कोणत्या ठिकाणाहून ऑक्सिजन नेले जाईल. कोणते प्लांट ऑक्सिजनाचं वितरण करेल याची मॅपिग केली गेली आहे.  आज १२ राज्यांशी केद्र सरकारने बैठक घेतली असून कोणत्या राज्याला किती पुरवठ्याची गरज आहे, त्याविषयी चर्चा झाली. सहा हजार १७७ मेट्रिक टन ऑक्सिजन प्रत्येक राज्यात विभागला जाणार आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र सर्वाधिक हिस्सा दिला जाणार आहे. महाराष्ट्राला १,५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. तर दिल्लीला ३५० मेट्रिक टन  आणि उत्तर प्रदेशला ८०० मेट्रिक टन ऑक्सिजन दिला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

यासह गोयल पुढे म्हणाले की, गरजूं रुग्णांच याचा पुरवठा करावा याची काळजी राज्यांनी घ्यावी. आम्ही राज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत. मी राज्य सरकारांना विनंती करतो की, ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवावे.  ज्या रुग्णांना गरज नाही त्यांनाही ऑक्सिजन लावला जात आहे. ऑक्सिजनची नासाडी होत असल्याचे वृत्त अनेक भागातून येत असल्याचे गोयल म्हणाले. केंद्र सरकारने सतत राज्य सरकारांसोबत बोलत आहे. सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून या महामारीत ज्या गोष्टीची गरज आहे, त्या सर्व केंद्र देत असल्याचं गोयल म्हणाले. गोयल म्हणाले की,  कोरोना संकट येण्याआधी मेडिकल ऑक्सिजनचा  दरदिवशी होणार वापर हा  फक्त १००० ते १२०० टन होता. एप्रिल १५ पासून याचा दरदिवशी होणारा वापर हा ४ हजार ७९५ मेट्रिक टन  वाढला आहे.  

मागील वर्षापासून सरकारने  पाच पट्टीने  मेडिकल ऑक्सिजन  उपलब्धता वाढवली आहे. ऑक्सिजन तयार करण्याची भारताची क्षमता ७ हजार १५७ मेट्रिक टन आहे, त्यातील ६० - ७० टक्के मेडिकल ऑक्सिजन राज्यांना दिले जात आहे. आता आम्ही आमच्या क्षमतेनुसार ११० टक्क्यापर्यंत ऑक्सिजनची निर्मिती करणार असल्याचंही गोयल म्हणाले.  एप्रिल १५ रोजी ७ हजार ८४६  मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती केली होती, त्यातील ४ हजार ७९५ मेट्रिक टन वापरण्यात आले आहे.  नऊ  उद्योग क्षेत्र सोडून बाकी उद्योग क्षेत्राला ऑक्सिजन न पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

गोयल पुढे म्हणाले की, वाहतूक सुरळीत होण्यासाठी  केंद्राने ग्रीन कॉरिओडर बनवलं आहे.  ऑक्सिजन सिलिंडर्स किंवा टॅकर रेल्वेने वाहिले जातील.  सिलिंडरची वाहतूक सूरू झाले आहेत. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज आहे त्या ठिकाणापर्यंतची जलद गतीने व्हावी यासाठी ग्रीन कॉरिडोअर करण्यात आले आहेत.  लष्कराचे शास्त्र वाहणारे  ३.३ ट्रकर्स  ऑक्सिजन वाहतुकीसाठी वापरले जात आहेत. हे कुठेच थांबले जात नसतात. त्यामुळे ऑक्जिन संभाव्य ठिकाणी गतीने पोहचते,असे गोयल यांनी  सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी