जागतिक पातळीवर मालदीवनं राखली मैत्री, भारताची साथ देत पाकिस्तानला दणका

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2020 | 21:26 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Maldives supports India at OIC's virtual meet: माले इथं असलेल्या भारतीय उच्चायोगानं भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवला म्हणून मालदीवचं कौतुक केलंय. जाणून घ्या काय घडलंय.

Imran Khan
जागतिक पातळीवर मालदीवनं राखली मैत्री, पाकिस्तानला दणका  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • इस्लामिक देशांच्या संघटनेच्या ओआयसीच्या वर्च्युअल मीटिंगमध्ये मालदीवनं दिली भारताची साथ
  • इस्लामोफोबिया वरून भारताला घेरण्याचा पाकिस्तानचा डाव मालदीवनं ठरवला निष्फळ
  • भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, भारताला घेरणाऱ्या अशा कुठल्याही प्रयत्नाला आम्ही पाठिंबा देणार नाही, मालदीवनं ठणकावलं

नवी दिल्ली: मुस्लिम देशांची संघटना (OIC)मध्ये भारताला घेराव घालण्याची पाकिस्तानची चाल मालदीवनं अयशस्वी केलीय. ओआयसीच्या वर्च्युअल बैठकीत पाकिस्तान इस्लामोफिबियावर भारताला घेराव घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र न्यूयॉर्कमध्ये मालदीवच्या स्थानिक प्रतिनिधी थीलमीजा हुसैन यांनी पाकिस्तानच्या या प्रयत्नावर पाणी फेरलं. बैठकीत उपस्थित हुसैन यांनी म्हटलं की, मालदीव ओआयसीच्या अशा कुठल्याही कारवाईचं समर्थन करू शकत नाही, जी भारताला टार्गेट करत असेल किंवा भारताला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असेल.

मालदीवच्या पाठराखणचं भारतानं केलं स्वागत

मालदीवच्या या पुढाकाराचं भारतानं स्वागत केलंय. माले इथं असलेल्या भारतीय उच्चायोगानं भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवला म्हणून मालदीवचं कौतुक केलंय. या बैठकीमध्ये मालदीवच्या प्रतिनिधींनी म्हटलं की, हिंसेच्या कुठल्याही रुपाचं मग ते इस्लामोफोबिया, जेनोफोबिया असो किंवा कुठल्या राजकीय अजेंड्याला वाव देण्यासाठी आम्ही हिसेंच्या विरोधात आहोत.

‘भारतात इस्लाम अनेक शतकांपासून आहे’

मालदीवच्या प्रतिनिधींनी म्हटलं की, कोणत्या विशेष देशाला टार्गेट करणं मूळ मुद्द्यापासून दूर नेण्यासारखं आहे. ते म्हणाले, ‘मला हे म्हणायचं आहे की, जगात सर्वात मोठा लोकशाही असलेला देश, विविधतेनं नटलेला आणि २० कोटींहून अधिक मुस्लिम जनता असलेल्या देशावर इस्लामोफोबियाचा आरोप करणं तात्विकदृष्ट्या चुकीचं आहे. भारतात इस्लाम अनेक शतकांपासून आहे आणि हिंदुस्तानात हा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. भारतात मुस्लिम लोकांची संख्या १४.२ टक्के आहे.’

इस्लामोफोबिया वरून भारताला घेराव घालण्याचा पाकिस्तानचा होता प्रयत्न

मालदीवनं पुढे म्हटलं की, सोशल मीडियावर चुकीच्या इच्छेनुसार सुरू असलेलं अभियान किंवा विशेष अशा इच्छेद्वारे प्रेरित लोकांचे लहान-मोठे वक्तव्य १.३ अब्ज लोकांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करणारं मानलं जावू शकत नाही. जगात इस्लामोफोबिया वरून भारताला बदनाम करण्याचा नापाक प्रयत्न पाकिस्तान खूप काळापासून करत आहे. याबाबतीत सुरक्षा एजेंसींनी सुद्धा भारत सरकारला माहिती दिलीय की, पाकिस्तान कथित इस्लामोफोबियाच्या मुद्द्यावरून भारताला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानची सध्या चोहोबाजूंनी कोंडी होत असल्यामुळे वारंवार आपल्या नापाक कारवायांना यश देण्याचा प्रयत्न करत आहे. पण जागतिक पातळीवर पाकिस्तानला तोंडावर पडावं लागतंय. तरीही आपल्या कारवाया थांबविण्याचं काम पाकिस्तान करत नाहीय. याचा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागू शकतो. कारण आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला मदतीची गरज आहे, पण जोपर्यंत आपल्या नापाक कारवाया पाकिस्तान थांबवणार नाही, तोपर्यंत अनेक देश त्यापासून दूर राहिल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी