पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे तीन सेट

mamta banerjee using three sets of laws in west bengal says amit shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर थेट कडाडून टीका केली.

mamta banerjee using three sets of laws in west bengal says amit shah
पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे तीन सेट  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे तीन सेट
  • पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला
  • पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार ममता सरकार बरखास्त करतील

कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) पश्चिम बंगालच्या (West Bengal) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारवर (government) थेट कडाडून टीका केली. पश्चिम बंगालमध्ये २०१० पासून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात सरकार कार्यरत आहे. या काळात सरकारी कामांतून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे दिसते, असे अमित शहा म्हणाले. (mamta banerjee using three sets of laws in west bengal says amit shah)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या भाजपला (Bharatiya Janata Party - BJP) संधी द्या. आम्ही खऱ्या अर्थाने पश्चिम बंगालला 'आमार बांगला सोनार बांगला' करुन दाखवू, असे अमित शहा यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतुआ समाजातील नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. या समाजाकडून पश्चिम बंगालमध्ये भाजपला भक्कम पाठिंबा मिळत आहे. लोकसभेसाठी २०१९मध्ये (Lok Sabha 2019 Election) झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक घटना घडली. तृणमूल काँग्रेसने (All India Trinamool Congress - TMC) २२ तर भाजपने १८ जागांवर विजय मिळवला आणि काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच भाजप हा पश्चिम बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष असल्याचे चित्र उभे राहिले. ज्या भाजपला पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमुळे संधी मिळत नव्हती त्यांना एकदम १८ जागांवर विजय मिळाला. या विजयानंतर उत्साह वाढलेल्या भाजपने जनहिताच्या मुद्यांवर आक्रमक भूमिका घ्यायला सरुवात केली. नागरिकांचा भाजपला पाठिंबा मिळू लागला. भाजपला मिळणारे समर्थन वाढू लागताच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात उघड संघर्ष सुरू झाला. मागील काही महिन्यात पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. या घटनेनंतरही भाजपचे राज्यातील काम सुरू आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप हा संघर्ष तीव्र होत असतानाच अमित शहा यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला आहे.

कोरोना संकट आणि पूरग्रस्तांना मदत देण्याच्या कामात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी आर्थिक लाभ मिळवण्यासाठीच दहा वर्षे काम केले. निवडणूक जवळ आल्यावरच ममता बॅनर्जी यांना नागरिकांची आठवण येते. एरवी जनहिताच्या कामांकडे दुर्लक्ष होते. 

ममता बॅनर्जी सरकारने पश्चिम बंगालचा कारभार चालवण्यासाठी कायद्यांचे तीन सेट केले आहेत. यातील पहिला सेट ममता बॅनर्जी यांच्या भाच्यासाठी (आणि ममता बॅनर्जींसाठी), दुसरा सेट तृणमूल काँग्रेसच्या व्होट बँकेसाठी आणि तिसरा सेट पश्चिम बंगालमधील सामान्य नागरिकांसाठी आहे. 

भारतात सर्वाधिक राजकीय हत्या पश्चिम बंगालमध्ये होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये वर्षभरात भाजपच्या १००पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. पण पोलीस तपास करुन दोषींवर कारवाई कुठे झाली?... येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप उसळी मारेल आणि २००पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल, असे अमित शहा म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपला नागरिकांचा आशीर्वाद लाभला. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नागरिकांचा भाजपला भरभरुन आशीर्वाद लाभेल. पश्चिम बंगालमध्ये कलम ३५६ अंतर्गत राज्यपाल राजवट लागू होईल का, असा प्रश्न अमित शहा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला अमित शहा यांनी थेट उत्तर दिले. पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार ममता सरकार बरखास्त करतील. हे सरकार स्वतःच पडेल, असे अमित शहा म्हणाले.

याआधी काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थाच उरली नसल्याचे अमित शहा म्हणाले. पश्चिम बंगालच्या प्रत्येक जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या विरोधकांवर दहशत बसवण्यासाठी देशी बॉम्ब आणि बंदुका तयार करण्याचे कारखाने सुरू आहेत. दिवसाढवळ्या तृणमूल काँग्रेसच्या विरोधकांच्या हत्या सुरू आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस दोषींवर कारवाई करणे टाळत आहेत. उगड उघड गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. ममता बॅनर्जी सरकार भ्रष्टाचार करणे आणि विरोधकांवर दहशत बसवणे हीच दोन कामं प्राधान्याने करत असल्याचा आरोपही अमित शहांनी केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी