सेफ सेक्सची मागणी केल्याने रागवलेल्या इसमाने केली महिलेची हत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 24, 2020 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

सेफ सेक्सची मागणी केली म्हणून रागवलेल्या एका इसमाने महिलेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सेक्स वर्करशी संबंध ठेवताना त्या महिलेने त्याला कंडोम वापरण्यास सांगितले.

Man angry on demanding safe sex from woman slit her throat
सेफ सेक्सची मागणी केल्याने रागवलेल्या इसमाने केली महिलेची हत्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सेफ सेक्सची मागणी केली म्हणून रागवलेल्या एका इसमाने महिलेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
  • ही घटना बंगळुरूमधील राजाजीनगर येथील आहे.
  • महिलेचा विरोध वाढू लागल्यानंतर आरोपीने तिच्या पोटात चाकू खुपसला.

बंगळुरू: सेफ सेक्सची मागणी केली म्हणून रागवलेल्या एका इसमाने महिलेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सेक्स वर्करशी संबंध ठेवताना त्या महिलेने त्याला कंडोम वापरण्यास सांगितले. मात्र त्याला ते मान्य नव्हते. महिला ऐकत नसल्याने त्याने तिची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, कथित सेक्स वर्कर असलेल्या महिलेने संबंध ठेवण्याच्या आधी कंडोमचा वापर करण्यास सांगितले आणि यावरून त्या इसमाला राग आला.

ही घटना बंगळुरूमधील राजाजीनगर येथील आहे. ही घटना मृत महिलेच्या घरीच घडली आहे. आरोपी मुकुंद एचएच याला पोलिसांनी अटक केली आहे. तो बंगळुरूतील इलेक्ट्रॉनिक सिटी येथे राहत असल्याचे समजते. आरोपीला बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीनंतर त्याने हत्येची कबुली दिली आहे.

महिला तिच्या घरी मुलासह राहत होती. ११ जानेवारीला दुपारी १ च्या दरम्यान आरोपी मुकुंद बससाठी थांबलेला असताना त्याची ओळख या महिलेशी झाली. ही ४२ वर्षीय महिला कथित सेक्स वर्कर असल्याचे सांगितले जात आहे. भेटल्यानंतर दोघांमध्ये अडीच हजारांचा सौदा झाला. बराच वेळ बोलल्यानंतर दीड हजार रूपयांवर हा सौदा झाला. आरोपी मुकुंदने महिलेला ५०० रूपये ऍडव्हान्स दिले होते. बसस्टॉपवरून ऑटो करत हे दोघेही महिलेच्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावर आरोपीने महिलेला उर्वरित १००० रूपये दिले. त्यानंतर महिलेने आरोपीला कंडोमचा वापर करण्यास सांगितले. यावर आरोपीने नकार दिला आणि तो दिलेले पैसे परत मागू लागला.

महिलेने आरोपीकडून घेतलेले पैसे परत करण्यास नकार दिला. महिलेने असुरक्षित सेक्स आणि पैसे परत करण्यास नकार दिल्यानंतर त्याला आरडाओरडा करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी मुकुंदने तिला चाकूचा धाक दाखवला आणि पैसे मागितले.

महिलेचा विरोध वाढू लागल्यानंतर आरोपीने तिच्या पोटात चाकू खुपसला. जखमी अवस्थेत महिलेने ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिचा गळा चिरून हत्या केली. तिथून पळून जाताना आरोपीने महिलेचे खोटे गादिने, पैसे आणि मोबाइल लंपास केला.

सायंकाळी ४च्या दरम्यान जेव्हा या महिलेचा मुलगा शाळेतून घरी आला तेव्हा आईचा मृतदेह पाहून त्याने तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा फोन ट्रेस करत आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला शोधून अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी