विधानसभेच्या टॉयलेटमध्ये गळा कापून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 24, 2019 | 21:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Suicide Attempt: कर्नाटकमधील विधानसभेच्या आतील प्रसाधनगृहात एक व्यक्ती गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

knife
विधानसभेच्या टॉयलेटमध्ये गळा कापून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न  |  फोटो सौजन्य: Representative Image

बंगळुरू: कर्नाटक विधानसभेच्या आत एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एका व्यक्तीने विधानसभेच्या आतील प्रसाधनगृहामध्ये आपला गळाच कापून घेतला असल्याचं प्राथमिक वृत्त समजतं आहे. विधानसभेच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रसाधनगृहामध्ये गळा कापलेल्या अवस्थेत एक व्यक्ती आढळून आली. यावेळी तो प्रचंड जखमी झालेला होता. ही व्यक्ती आपल्यासोबत ब्लेड घेऊन आला होता. त्यानंतर जखमी अवस्थेतच त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण या संपूर्ण प्रकारामुळे कर्नाटक विधानसभेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या सगळ्या घटनेमुळे विधानसभेत एकच गोंधळ झाला होता. 

या प्रकरणी पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी अशी माहिती दिली की, हे आत्महत्येचं प्रकरण असू शकतं. दरम्यान, विधानसभेत जखमी अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचं नाव रवन्ना कुमार असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार बंगळुरूपासून ६० किमी दूर असलेल्या चिकबलापूरचा रहिवासी आहे. सध्या रवन्नावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरकडून सांगण्यात येत आहे. 

पोलिसांना विधानसभेतील प्रसाधनगृहाजवळ सुसाइड नोट देखील मिळाली आहे. पण या सुसाइड नोटमध्ये नेमकं काय लिहलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या या व्यक्तीचा प्रकृती ठीक आहे. पण त्याने हे कृत्य नेमकं कशासाठी केलं याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेलं नाही. सध्या पोलीस रवन्नाचा जबाब घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत. कर्नाटकमधील विधानसभेत असा प्रकार घडल्याने आता याप्रकरणी चौकशीही केली जाणार आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात मंत्रालयजवळ अनेकदा काही जणांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण पोलिसांच्या समयसुचकतेमुळे येथे बऱ्याच अप्रिय घटना टळल्या आहेत. अनकेदा नागरिक हे आपल्या मागण्या घेऊन हे मंत्रालय किंवा विधानसभेच्या परिसरात येतात. पण बऱ्याचदा त्यांचा भ्रमनिरास होतो. पण यावेळी काही जण टोकाचं पाऊल उचलतात. यापुढे अशा घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने काही ठोस उपाययोजनाही करणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
विधानसभेच्या टॉयलेटमध्ये गळा कापून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न Description: Suicide Attempt: कर्नाटकमधील विधानसभेच्या आतील प्रसाधनगृहात एक व्यक्ती गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles