सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Bengaluru: Man attempts suicide by consuming sanitiser inside Vidhana Soudha नंदा कुमार या ५२ वर्षांच्या टीव्ही तंत्रज्ञाने सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्नाटकच्या विधानसभेच्या इमारतीत प्रवेश करुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Man attempts suicide by consuming sanitiser
सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न 
थोडं पण कामाचं
  • सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
  • कर्नाटकच्या विधानसभेच्या इमारतीत आत्महत्येचा प्रयत्न
  • पोलीस तपास सुरू

Bengaluru: Man attempts suicide by consuming sanitiser inside Vidhana Soudha बंगळुरू: नंदा कुमार या ५२ वर्षांच्या टीव्ही तंत्रज्ञाने सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कौटुंबिक कारणातून त्यांनी ही कृती केली. कर्नाटकच्या विधानसभेच्या इमारतीत प्रवेश करुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

खोटी माहिती देऊन नंदा कुमार यांनी विधानसभेच्या इमारतीत प्रवेश केला होता. इमारतीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी खोली क्रमांक १०६ जवळ सार्वजनिक वापरासाठी ठेवलेले सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. इमारतीत असलेल्या होमगार्डनी सॅनिटायझरची बाटली नंदा कुमार यांच्या हातातून हिसकावून घेतली. यानंतर नंदा कुमार यांना तातडीने बोरिंग हॉस्पिटलमध्ये (Bowring Hospital) दाखल करण्यात आले. 

याआधी काही दिवसांपूर्वी नंदा कुमार यांनी पत्नी आणि घरातील इतर सदस्यांविरुद्ध जेसी नगर पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी नंदा कुमार यांच्या घरातील सदस्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची समजूत काढली. पण या प्रकारामुळे नंदा कुमार नाराज झाले. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन अटकेची कारवाई करावी, असे त्यांना वाटत होते. पण पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून निराश झालेल्या नंदा कुमार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी