Male Fertility : बाप रे बाप! 85 व्या वर्षी झाला बाप, 35 वर्षांच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म

एका व्यक्तीनं वयाच्या 85 व्या वर्षी एका बाळाचा बाप होण्याचा निर्णय घेतला. या वयात बाप झालेल्या व्यक्ती काय करू शकतात, याचा वस्तुपाठच ते घालून देत आहेत.

Male Fertility
85 व्या वर्षी झाला बाप  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • 85 व्या वर्षी बनला बाप
  • मुलासोबत घालवणार उरलेलं आयुष्य
  • मुलासाठी सुरुय खास रेकॉर्डिंग

Male Fertility : आपण बाळाचे बाप झालो असून आपल्या पत्नीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे, अशी माहिती एका 85 वर्षांच्या व्यक्तीनं दिली आहे. प्रेम करायला वय नसतं, असं म्हणतात. मात्र आई किंवा बाप होण्याला नैसर्गिक मर्यादा असल्याचं अनेकदा दिसून येतं. वाढत्या वयानुसार प्रजननक्षमता कमी होत जाते आणि वयाच्या एका टप्प्यानंतर ती थांबते, असं अनेकदा दिसून आलं आहे. मात्र आरोग्य सांभाळलं आणि फिटनेस टिकवला, तर काय कमाल करता येऊ शकते, याचा वस्तुपाठच अर्जेंटिनातील एका नागरिकाने घालून दिला आहे. 

85 व्या वर्षी झाले बाप

अर्जेंटिनाचे रहिवासी असणारे अल्बर्टो कोर्मिलिएट यांनी काही वर्षापूर्वी तिशीतल्या तरुणीशी लग्न केलं होतं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं 2017 साली निधन झालं. त्यानंतर त्यांनी नव्या जोडीदाराची निवड केली होती. वयाच्या या टप्प्यावर आपल्याला मूल असावं, असं त्यांच्या पत्नीला वाटत होतं. त्यामुळे दोघांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि तडीस नेला. ॲस्टेफनिया फर्टिलिटी ट्रिटमेंटची मदत घेऊन या जोडप्यानं मुलाला जन्म दिला आहे. 

मुलाला सांभाळण्याचा विश्वास

आपण या वयातही मुलाचा व्यवस्थित सांभाळ करू शकतो, असा विश्वास अल्बर्टो यांना आहे. अल्बर्टो हे आहारतज्ज्ञ आहेत. याच कलेचा आणि ज्ञानाचा वापर करत त्यांनी आपल्या फिटनेस या वयातही जपला आहे. माणसाच्या जिवंत राहण्याच्या काळावर मर्यादा आहेत. मात्र जितका काळ आपलं आयुष्य असेल, तितका काळ आपण बाळासोबत राहू आणि त्याचा सांभाळ करत राहू, अशी प्रतिक्रिया अल्बर्टो यांनी दिली आहे. आपल्या बाळात त्यांची मोठी भावनिक गुंतवणूक असून आयुष्यातील उरलेल्या वेळेपैकी बहुतांश वेळ बाळासोबत घालवण्याची त्यांची इच्छा आहे. 

अधिक वाचा - नशीब बलवत्तर म्हणून...भरधाव ट्रेनखाली सापडुनही बचावला 85 वर्षीय वृद्ध, पाहा व्हिडिओ

बाळासाठी करतात रेकॉर्डिंग

अल्बर्टो यांनी आतापासूनच काही ऑ़डिओ आणि व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली आहे. आपलं मूल मोठं होईल, तेव्हा आपण या जगात असू की नसू, यावर त्यांना शंका आहे. त्यामुळे मुलाला वयाच्या त्या त्या टप्प्यावर आपल्याला जे जे सांगायचं आहे, ते आपण रेकॉर्ड करून ठेवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात ही संकल्पना दाखवण्यात आली होती. मात्र अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना नियमितपणे राबवली जाते. पालक आपल्या मुलांसाठी संदेश रेकॉर्ड करून ठेवतात आणि मुलांना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर ते उपलब्ध करून देण्याची सोय करून ठेवतात. त्यामुळे पालकांचं अकाली निधन झालं तरी मुलांना आपल्या आईवडिलांचा आवाज आणि संदेश ऐकता येतो. 

अधिक वाचा - Europe Tour : या युरोपीय देशांत रुपयाचा बोलबाला, स्वस्तात होईल आठवड्याची सहल

शॉर्ट टर्म प्लॅनिंग

वयाच्या या टप्प्यावर आपण फक्त शॉर्ट टर्म प्लॅनिंग करत असल्याचं अल्बर्टो सांगतात. आजचा दिवस आनंदात कसा जाईल, याचाच केवळ ते विचार करत असतात. आपल्या मुलाला चिनी भाषा शिकवण्याचा त्यांचा विचार असून त्यासाठी ट्यूटरही त्यांनी निश्चित केला आहे. त्याशिवाय ते त्याला ऑर्गन वाजवायलाही शिकवतात. त्यांना एकूण दोन मुलं आणि तीन नातवंडं आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी