सासरच्यांकडून जावयाची निर्घृण हत्या, कारण ऐकून झाले सर्वच हैराण

Crime News: जावयाची सासरच्या मंडळींनीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • पत्नीच्या माहेरील नातेवाईकांनी केली जावयाची हत्या
  • सुपारी देऊन जावयाचा काढला काटा
  • या घटनेप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक 

हैदराबाद : येथील २५ वर्षीय शनिवरपू व्यंकट नारायण रेड्डी या व्यक्तीची हत्या (murder) करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. मृतक रेड्डी याचा मृतदेह जिन्नाराम वनक्षेत्रात आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवली आणि आपला तपास सुरू केला. रेड्डी याची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आणि पोलिसांनी त्या दृष्टीने आपला तपास सुरू केला.

पोलिसांनी दोन आरोपींना अटक (two accused arrested) केली असून त्यांची नावे गजुलापल्ली श्रीनिवास रेड्डी आणि कमलापती कासी राव अशी असल्याची माहिती समोर आली आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या प्रकरणी आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पत्नीच्या नातेवाईकांनी दिली सुपारी

माधापूरचे पोलीस उपायुक्त शिल्पावल्ली यांनी शनिवारी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, रेड्डी याची हत्या कथितपणे त्याचे सासरे व्यंकटेश्वर रेड्डी आणि आणखी एक नातेवाईक चंद्रशेखर रेड्डी यांच्या आदेशाने करण्यात आली. सध्या हे दोन्ही आरोपी फरार आहेत. मृतक रेड्डी याने जवळपास एक वर्षांपूर्वी रावली हिच्यासोबत विवाह केला होता. मात्र, तिच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. कारण, रेड्डी हा दुसऱ्या समाजातला होता.

हे पण वाचा : "काम असेल तर फोन लावायला सांगतो, कॅमेरा सुरू करायला नाही" मुख्यमंत्री शिंदेंच्या व्हिडिओवरुन अजितदादांचा टोला

पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, रेड्डीची पत्नी रावली ही लग्ना नंतर आपल्या आई-वडिलांकडे परत आली होती. रावलीच्या आई-वडिलांनीही तिचा स्वीकार करण्याचं सागंत आणि त्यानंतर एका भव्य समारोहात दोघांचा विवाह लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ज्यावेळी रावली आपल्या माहेऱी आली तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिचा विवाह अन्य मुलासोबत लावण्याचा प्रयत्न केला.

हे पण वाचा : "थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि...." Aaditya Thackeray यांचं बंडखोरांना ओपन चॅलेंज 

हत्येसाठी सुपारी

यानंतर रेड्डी याने कथितपणे आपल्या मित्रांसोबत आपले खाजगी फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. तसेच रावलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्याला रोखण्यासाठी रावलीच्या वडिलांनी आणि भावाने कथितपणे गजुलापल्ली आणि आणखी एका व्यक्तीला रेड्डीला ठार मारण्याची सुपारी दिली. तसेच अॅडव्हास म्हणून ५०००० रुपये सुद्धा दिले आणि हत्या झाल्यावर उर्वरित १.९ लाख रुपये देण्याचं आश्वासनही दिलं होतं.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे हलवली आणि शोध सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी एकूण दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी