मेट्रोतून घरी जात होती तरुणी, प्रायव्हेट पार्ट दाखवून व्यक्तीने केले अश्लील इशारे 

ही घटना नवी दिल्ली मेट्रोतील  येलो लाइन मेट्रोची असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित तरूणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार केली आहे. तरूणी ऑफीसमधून घरी जात असताना ही घटना घडली. 

man flashed his private part to woman in delhi metro probe underway crime news in marathi tcrim 13
मेट्रोतून घरी जात होती तरुणी, प्रायव्हेट पार्ट दाखवून व्यक्तीने केले अश्लील इशारे  

नवी दिल्ली :  नुकतेच गार्गी कॉलेजच्या तरूणींनी छेडछाचे प्रकरणाचा छडा लागला नसताना अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. यात दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीने महिलेला आपले लिंग दाखवून अश्लिल इशारे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दिल्ली मेट्रोच्या येलो लाइनवर घडला आहे. तरूणीने स्वतः ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे ती स्तब्ध झाली होती, पण हिम्मत करून तिने तक्रार केली आहे. 

डीएमआरसी यांना टॅग करून आपल्या ट्विटर हँडलवरून ग्रे जॅकेट आणि बॅग घेतलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. यात मेट्रो गेटवर उभा दिसत आहे. पीडित तरूणीने आपल्या तक्रारीत म्हटले  मी जवळच्या दोन सीटच्या जागेवर बसली होती. जेव्हा हा व्यक्ती समोर उभा होता. ही घटना सायंकाळी ६ वाजेची आहे. ती तरूणी आपल्या ऑफिसमधून घरी परतत होती. अचानक त्याने आपला प्रायव्हेट पार्ट दाखवून तिच्याकडे अश्लील इशारे करू लागला. त्यामुळे ती खूप घाबरली. 

सुरूवातीला तिला काहीच समजले नाही, की काय करायचे. काही काळ ती स्तब्ध झाली होती. पण नंतर तिने ही घटना आपल्या मैत्रिणीला सांगितली तर तिच्या सल्लानंतर तक्रार करण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर गुरूवारी सकाळी ९.३० मिनिटांनी हिम्मत दाखवत घिटोरनी मेट्रो स्टेशनवर पोहचली आणि आपली तक्रार दाखल कले. आपल्या ट्विटमध्ये हे पण लिहिले की हे तिचे पहिले ट्विट आहे आणि खेदाना याची सुरूवात लैंगिक छळाच्या अनुभवाने करत आहे. 

मेट्रोमधील या घटनेमुळे तिला प्रचंड धक्का बसला होता. पण त्या परिस्थितीतही तीने त्या नराधमाचे आपल्या मोबाईवर फोटो काढले. ते तीने आपल्या ट्विटरवर शेअरही केले आहे. सुरूवातीला मी घाबरली होती. मला माहिती नाही की कोणत्या स्टेशनवर ही घटना घडली होती. नंतर फोटोच्या डिटेलवरून समजले की बुधवारी सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी ही घटना सुल्ताननगर वॉटर ट्रिटमेंट प्लांट जवळ हे फोटो घेतले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...