[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 17, 2019 | 11:35 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Shocking case: एका व्यक्तीला बेदम मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यामुळेच त्यांना मारहाण केल्याचं बोललं जात आहे.

man forced drink urine love affair aunty rajasthan video viral
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • प्रेम संबंधांंमुळे पुरुषाला बेदम मारहाण
  • ग्रामस्थांनी मारहाण करुन कापले दोघांचे केस
  • त्यानंतर ग्रामस्थांनी तरुणाला जबरदस्ती पाजली लघुशंका
  • पीडित तरुणाचे आपल्याच काकूसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप

जयपूर: सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत काही ग्रामस्थ एका पुरुषाला आणि महिलेला मारहाण करत असल्याचं पहायला मिळत आहे. इतकचं नाही तर ग्रामस्थांनी या व्यक्तीला कथित स्वरूपात लघुशंका सुद्धा पाजली. या व्यक्तीचे आपल्या काकूसोबत प्रेमसंबंध होते असा आरोप करत ग्रामस्थांनी त्याला मारहाण केली आणि त्यासोबतच कथित स्वरूपात जबरदस्तीने लघुशंका पाजली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

संतप्त ग्रामस्थांनी या पुरुषाला आणि महिलेला बेदम मारहाण केली. तसेच दोघांचे केसही कापले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हे महिलेच्या परिवारातील सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील निंबी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

आरोप आहे की, या पुरुषाचे आणि महिलेचे अवैध संबंध होते. या दोघांना गावातील नागरिकांनी रंगेहात पकडल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी या दोघांना बेदम मारहाण केली. दोघांचे केस कापले आणि तोंडाला काळ फासलं. त्यानंतर कथित स्वरूपात पुरुषाला जबरदस्तीने लघुशंका पाजल्याची माहिती समोर येत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, या दोघांना मारहाण होत असताना त्यांच्या आजुबाजुला अनेक नागरिक उभे आहेत मात्र, कुणीही ग्रामस्थांना रोखण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. तर केवळ बघ्यांची भूमिका घेताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागौर जिल्ह्यातील निंबी गावात असलेल्या पुरुषाचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि एकेदिवशी या दोघांना ग्रामस्थानी रंगेहात पकडलं. त्यानंतर ग्रामस्थांनी पंचायत बोलावली आणि दोघांना बेदम मारहाण करत त्यांचे केस कापले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी