टीव्ही पाहतो म्हणून 'त्याने' केली चिमुकल्याची हत्या

लोकल ते ग्लोबल
Updated May 21, 2019 | 18:54 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

गुरूग्राममध्ये टीव्ही पहाणाऱ्या मुलाचा गळा आवळून खून झाल्याची घटना हरियाणाच्या गूरूग्राममधुन समोर आली आहे. जाणून घ्या खूनामागची कारणं.

man killed boy
टीव्ही पाहतो म्हणून 'त्याने' केली चिमुकल्याची हत्या  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबईः हरियाणाच्या गुरूग्राममध्ये २० वर्षीय यूवकाने एका लहान मुलाचा गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हरियाणातील गडोली खुर्द येथील लोटस गार्डन जवळच असलेल्या लाकडाच्या वखारीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा अरोपीच्या खोलीत टीव्ही पहायला आला होता, या गोष्टीचा राग येऊन त्या मुलाचा गळा आवळून त्याची हत्या आरोपीने केली आहे. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचं कळतयं. मृत मुलाचं नाव राहुल खान असून तो आपल्या वडिलांना भेटायला आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या खोलीत राहुल झोपला होता त्या खोलीची ग्रील तोडून त्याने खोलीत प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने उशी आणि टॉवेलच्या सहाय्याने राहुलचा गळा आवळला. या घटनेत राहुलचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले, अरोपीने खुनाचा गुन्हा मान्य केला असून त्याने सांगितले की, राहुल वारंवार त्याच्या खोलीत टीव्ही पाहण्यासाठी येत असे. त्याने राहुलला खोलीत न येण्यास सांगितले होते. पण राहुलने त्याचे कधीचं ऐकलं नाही. या गोष्टीवरुन दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते.

सेक्टर १० ए च्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने खोलीत येण्यास रोखले असतानाही प्रत्येक वेळेस मृत राहुल त्याच्याशी उद्धटपणाने वागत असे. याचा राग मनात ठेऊन बदला घेण्याचा निर्णय आरोपीने घेतला. आरोपीचा यापूर्वी कुठल्याही प्रकारचा क्रिमिनल रेकॉर्ड नसल्याचंही यावेळी पोलिसांनी सांगितले.

दरम्यान,मृत राहुलच्या वडिलांनी हिंदूस्तान टाइम्सला सांगितलं की, ते मागील एक वर्षापासून गुरूग्राममध्ये राहत होते. ते एका कारखान्यात काम करतात. पुढे त्यांनी सांगितले, आरोपी त्यांच्या मुलाला नेहमी रागावत असे तसेच त्याला मारण्याची धमकी देत असे.

तपासा दरम्यान पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहारचा असून आपल्या गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याआधीच पोलिसांना त्याला अटक केली आहे. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेली उशी आणि टॉवेल पोलिसांना पोलिसांना घटनास्थळी मिळाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी