थुंकण्यावरुन वाद, एका व्यक्तीने घेतला दुसऱ्याचा जीव 

Crime: दिल्लीत रस्त्यावर थुंकण्याच्या वादातून एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

man killed after quarrel over spitting the victim and accused fought and both sustained injuries
थुंकण्यावरुन वाद, एका व्यक्तीने घेतला दुसऱ्याचा जीव   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • थुंकण्यावरुन झाला वाद, वादातून एकाची हत्या
  • दोन व्यक्तींमध्ये तुफान हाणामारी
  • हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू, राजधानी दिल्लीतील घटना

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील मंदिर मार्ग परिसरात आज (गुरुवार) एका क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची  हत्या झाल्यीच खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रस्त्यावर थुंकल्याबद्दल सुरुवातीला दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. पण नंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्यात एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीची हत्या केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाणीत पीडित आणि आरोपी दोघेही गंभीर जखमी झाले होते. ज्यात नंतर पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला. थुंकण्यावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या झाल्याने येथील लोकांना देखील धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. या भांडणात दोन व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीला गंभीर इजा झाली होती आणि त्यातच त्याने आपले प्राण गमावले. 

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये

सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्याचवेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात यावं यासाठी सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे. याशिवाय सार्वजनिक थुंकण्यावर देखील बंदी घालण्यात आहे. कारण यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. याचवेळी दिल्लीतील मंदिर मार्ग परिसरात एक व्यक्ती थुंकल्याने त्यातून वाद निर्माण झाला आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 

सार्वजनिक ठिकाणी हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असं करणं कटाक्षाने टाळावं. जेणेकरुन स्वच्छता राखण्यात आपल्या सर्वाचाच हातभार राहील. कोरोना संकटाच्या काळात आपण जेवढी स्वच्छता पाळू तेवढं हे संकट हटविण्यास मदत होणार आहे.

देशात मागील २४ तासात ९९९६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

दरम्यान, देशात मागील २४ तासात कोरोनाचे जवळजवळ दहा हजारांच्या जवळपास रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाची  चिंता पुन्हा वाढली आहे. मागील २४ तासात देशात तब्बल ९९९६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी