Murder of partner: आपल्या लिव्ह-पार्टनरकडून (Live-in partner) लग्नाचा तगादा सुरु असल्यामुळे वैतागलेल्या तरुणाने तिचा निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. मूळच्या मुंबईकर असलेल्या या तरुणीचा दिल्लीत खून करण्यात आला आला. तब्बल पाच महिन्यांनी या घटनेचा उलगडा झाला असून तरुणाने अत्यंत थंड डोक्याने या तरुणीचा खून केल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत कुटुंबीय त्रास देत असून लग्नाला विरोध करत असल्याचं कारण देत हे कपल दिल्लीला गेलं होतं. मात्र तिथं गेल्यावर तरुणीचा भ्रमनिरास झाला.
मुंबईत राहणाऱ्या श्रद्धा नावाच्या मुलीचं अमीन पूनावाला नावाच्या तरुणावर प्रेम जडलं होतं. मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करत असताना दोघांची एकमेकांशी ओळख झाली होती. हळूहळू ही ओळख वाढत गेली आणि दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. श्रद्धाने ही बाब आपल्या घरी सांगितली. मात्र तिच्या घरच्यांचा या संबंधांना विरोध होता. आपल्याला हे नातं पसंत नसून या लग्नाला ठाम विरोध असल्याची भूमिका श्रद्धाच्या कुटुंबीयांनी घेतली होती. त्यानंतरही श्रद्धा आणि अमीन यांनी एकमेकांना भेटणं सुरूच ठेवलं होतं. घरच्यांच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी मुंबई सोडून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.
अधिक वाचा - Village for Sale: नाममात्र किंमतीत अख्खं गावच विक्रीसाठी उपलब्ध, चाळीस घरं एकत्र विकत घेण्याची संधी
श्रद्धा आणि अमीन हे दोघं दिल्लीत गेले आणि तिथं एक फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काही काळ एकत्र राहिल्यानंतर श्रद्धाने अमीनला लग्नाबाबत विचारणा करायला सुरुवात केली. मात्र अमीन त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत नव्हता. दरम्यानच्या काळात श्रद्धाच्या घरून तिला वारंवार फोन केले जात होते. लग्नाबाबत वारंवार विचारणा होत असल्यामुळे तिने घरच्यांचे फोन घेेणं बंद केलं होतं. मात्र अमीन लग्नाच्या मागणीला होकार देत नसल्यामुळे तिची आणि अमीनची भांडणं सुरू झाली होती.
लग्नाचा तगादा लावल्याने वैतागलेल्या अमीनने एक दिवस श्रद्धाचा खून केला आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा फैसला केला. त्यासाठी त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. हे तुकडे भरून ठेवण्यासाठी त्याने बाजारातून महागडा फ्रीज विकत आणला. दररोज रात्री बाहेर जाताना तो पिशवीतून एक तुकडा घेऊन जात असे आणि रस्त्याच्या कडेला फेकून देत असे. वाटेतील प्राणी, पक्षी, किटक तो खाऊन टाकतील आणि कुठलाही पुरावा राहणार नाही, असा त्याचा डाव होता.
अधिक वाचा - तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोट
श्रद्धाचा काहीच संपर्क होत नसल्याने तिचे वडील दिल्लीला आले आणि त्यांनी फ्लॅटवर जाऊन तिची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी फ्लॅटला कुलूप होतं. आपल्या मुलीच्या अपहरणाची आणि ती गायब झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत नोंदवली. पोलिसांनी अमीनचा शोध घेत तपास केला असता, त्यांना ही भयंकर वस्तुस्थिती समजली.