Murder for friendship | आपल्या मित्राने मैत्री तोडली, या कारणावरून मित्राचाच खून करण्यात आल्याची घटना केरळमध्ये घडली आहे. मैत्री हे वास्तविक प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नातं असतं. मित्र एकमेकांसाठी जीव द्यायलाही तयार असतात. मात्र याच मैत्रीच्या नादात एकमेकांचे जीव घेतले जातील, याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. केरळमध्ये घडलेल्या या घटनेनं एक मित्र दुसऱ्या मित्राच्या बाबतीतही किती पझेसिव्ह होऊ शकतो, हे समोर आलं आहे.
केरळच्या कोची भागातील कलूरमध्ये 24 वर्षांच्या ख्रिस्तोफर डीक्रूजची सचिन नावाच्या तरुणासोबत मैत्री होती. दोघंही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते. काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून या दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर सचिननं ख्रिस्तोफरशी मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला होता. आपली मैत्री संपुष्टात आली असून आपल्याला मैत्रीचं नातं पुढं सुरू ठेवण्यात काहीही रस नाही, असं सचिननं सांगितलं होतं आणि तो वेगळ्या ठिकाणी राहायला गेला होता. सचिननं मैत्री तोडली ही बाब ख्रिस्तोफरला अस्वस्थ करत होती. ही मैत्री पुन्हा प्रस्थापित व्हावी, यासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र सचिनकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता.
अधिक वाचा - #No2Hijab : आम्हाला घ्यायचाय मोकळा श्वास! हिजाबला विरोध करत हजारो इराणी महिला रस्त्यावर
आपल्याला काही महत्त्वाचं बोलायचं असल्याचं सांगून ख्रिस्तोफरने एका हॉटेलमध्ये सचिनला बोलावून घेतलं. ख्रिस्तोफरचे सततचे फोन आणि मेसेजेस यातून सुटका मिळावी आणि एकदाच या विषयाचा सोक्षमोक्ष लावावा, या उद्देशाने सचिनही तिथे आला. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. ख्रिस्तोफरने सचिनसमोर पुन्हा एकदा मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. जे काही घडलं ते विसरून जाऊन पुन्हा नव्याने मैत्रीला सुरुवात करूया, असा प्रस्ताव त्याने दिला. मात्र सचिनने हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. यापुढे आपल्याला संपर्क करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नकोस, असंही त्याला सांगितलं.
अधिक वाचा - तरुणींच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सचिन मैत्रीला तयार होत नाही, हे लक्षात आल्यावर ख्रिस्तोफरने आपल्या बॅगेतून आणलेली मिरची पूड त्याच्यावर टाकली. त्यानंतर आपल्या बॅगेतील चाकू काढून त्याच्या गळ्यावर वार केले. हे झाल्यावर ख्रिस्तोफरने स्वतःचा गळा आणि हातही कापून घेतले. सचिन जखमी अवस्थेत तडफडत राहिला, तर ख्रिस्तोफर तसाच एका जागी बसून राहिला. थोड्या वेळात त्याचा जीव गेला.
सचिनच्या गळ्यावर वार झाल्याने तो मदत मागू शकला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या कुणालाही त्याच्या अवस्थेची कल्पना आली नाही. त्यानंतर नागरिकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अधिक वाचा - Crime News: मध्यरात्री टॉयलेटला गेला पती अन् परतल्यावर बेडवर पत्नी....
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ख्रिस्तोफरचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. सचिनवर उपचार सुरू असून तो काहीही बोलण्याच्या अवस्थेत नाही. या घटनेचा तपास करून सत्य समोर आणलं जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.