फोन न उचलल्याने संतापलेल्या बाथटबमध्ये बुडवून पतीने केली पत्नीची हत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 17, 2019 | 23:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Man Killed Wife: पत्नी फोन उचलत नसल्याने संतापलेल्या पतीने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोघांमध्ये आधी जोरदार वाद झाला आणि त्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली. पाहूयात कुठं घडला हा प्रकार...

Bathtub
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • पत्नीने उचलला नाही फोन, पतीने केली हत्या
  • पत्नी अमेरिकेत तर पती कॅनडात राहत होता
  • घटस्फोटावरुन झाला वाद आणि नंतर हत्या

नवी दिल्ली: पती आणि पत्नीमध्ये वाद कुठल्या ना कुठल्या कारणावरुन किरकोळ वाद होत असतात. मात्र, आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने फोन उचलला नाही म्हणून संतापलेल्या पतीने तिला बाथटबमध्ये बुडवून मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात भारतीय वंशाच्या पतीला अमेरिकेतील न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. आरोपीला २०११ रोजी आरोपीला भारतातून अमेरिकेत आणण्यात आलं. सोमवारी अमेरिकेतील न्यायालयाने अवतार ग्रेवाल (४४ वर्षे) याला आपली पत्नी नवनीत कौर हिची २००७ मध्ये हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवलं. ग्रेवाल याने नवनीत कौर हिला बाथटबमध्ये बुडवून तिची हत्या केली होती. ग्रेवाल याला दोषी ठरवल्यानंतर आता २३ ऑगस्ट रोजी या प्रकरणी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.

दीर्घकाळ नात्यात राहिल्यावर दोघा पती-पत्नीने २००५ मध्ये लग्न केलं. ग्रेवाल कॅनडामध्ये राहत होता तर पत्नी कौर व्हिसावर अमेरिकेत राहत होती. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, ग्रेवाल याने कौर सोबत लग्न केल्यानंतर आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरूवात केली होती. 

सरकारी वकिलांच्या मते, ग्रेवाल याने आपली पत्नीची क्षणोक्षणाची माहिती मिळवण्यासाठी दिवसातून वारंवार फोन करत असे. जेव्हा कधी फोन उचलला नाही जायचा तेव्हा पत्नीच्या कार्यालयातील इतर व्यक्तींच्या फोनवर फोन करत असे. लग्नानंतर कौर हिने ग्रेवालकडे घटस्फोट देण्याची मागणी केली होती. यानंतर ग्रेवाल याने याने पत्नीसोबत चर्चा करण्याचं म्हटलं आणि कॅनडाहून तिच्या घरी पोहोचला. ग्रेवाल घरी आल्यावर कौर हिने पुन्हा एकदा घटस्फोट देण्याची मागणी केली आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. मग संतापलेल्या ग्रेवाल याने पत्नीची हत्या केली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रेवाल याने १२ वर्षांपूर्वी पत्नीची हत्या केली होती. त्यावेळी घटस्फोटाच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आता न्यायालयाने ग्रेवाल याला दोषी ठरवलं. ग्रेवाल याला २३ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ग्रेवाल आणि कौर यांचा प्रेमविवाह २००५ मध्ये झाला होता. ग्रेवाल कॅनडात तर पत्नी अमेरिकेत राहत होती. ग्रेवाल वारंवार पत्नीला फोन करत असे मात्र, कौर फोन उचलत नव्हती. 

न्यायालयात वकिलांनी सांगितले की, आरोपीचं आधीपासूनच पत्नीच्या प्रति व्यवहार हा चांगला नव्हता. लग्नाच्या दरम्यान पत्नीचं ऑपरेशन होतं आणि ती अमेरिकेत आपल्यावर उपचार करत होती. मात्र, ग्रेवाल हा तिचं ऑपरेशन कॅनडा करण्यास इच्छुक होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
फोन न उचलल्याने संतापलेल्या बाथटबमध्ये बुडवून पतीने केली पत्नीची हत्या Description: Man Killed Wife: पत्नी फोन उचलत नसल्याने संतापलेल्या पतीने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोघांमध्ये आधी जोरदार वाद झाला आणि त्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली. पाहूयात कुठं घडला हा प्रकार...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...