Murder : पत्नीच्या बॉयफ्रेंडला दिली भयंकर शिक्षा, खून करून जंगलातच जाळला मृतदेह, असा लागला छडा

आपल्या पत्नीला त्रास देणाऱ्या तिच्या बॉयफ्रेंडचा पतीनं खून करून त्याचा मृतदेह जाळून टाकला. मात्र लवकरच पोलिसांना याागचं सत्य समजलं.

Murder
पत्नीच्या बॉयफ्रेंडला दिली भयंकर शिक्षा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पत्नीच्या बॉयफ्रेंडचा केला खून
  • मृतदेह दिला पेटवून
  • गुराख्यांमुळे लागला गुन्ह्याचा छडा

Murder : आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या आणि तिला वारंवार फोन करणाऱ्या एका तरुणाला महिलेच्या पतीनं थेट मारून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीसोबत तिच्या बॉयफ्रेंडचे संबंध समजल्यावर तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या या पतीने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. थंड डोक्याने त्याने त्याच्या खुनाची योजना आखली आणि आपल्या मित्रांच्या मदतीने हा प्लॅन पूर्णत्वाला नेला. 

फोनमुळे आला संशय

मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचा संसार सुरळीत सुरू होता. आपल्या पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे, याची तिच्या पतीला बिलकूल कल्पना नव्हती. मात्र काही दिवसांनी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर त्या दोघांचे संबंध ताणले जाऊन महिलेने त्याच्याशी संपर्क साधणं बंद केलं होतं. यामुळे अस्वस्थ झालेला तिचा बॉयफ्रेंड तिला वारंवार फोन करून बोलण्याचा प्रयत्न करत होता. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत फोन न करण्याचा इशारा महिलेनं त्याला दिला होता. मात्र तरीही तो सातत्याने तिला फोन करून त्रास देत होता. 

पतीला समजले सत्य

आपल्या पत्नीला सातत्याने कुणाचा तरी फोन येत असून त्यावरून ती अस्वस्थ होत असल्याचं तिचा पती पाहत होता. एक दिवस त्याविषयी त्याने पत्नीला विचारणा केली. त्यावर आपल्याला एक तरुण फोनवरून त्रास देत असल्याचं तिने सांगितलं. आपल्या ओळखीचीच ही व्यक्ती असून आपल्याला मात्र त्याच्याशी कुठलाही संबंध ठेवण्याची इच्छा नसल्याचं पत्नीने पतीला सांगितलं. हा इसम नाहक वारंवार फोन करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही तिने आपल्या पतीला सांगितलं. 

पतीने आखला खुनाचा डाव

या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्लॅन तिच्या पतीने आखला. यासाठी त्याने आपल्या तीन मित्रांची मदत घेतली. मित्रांच्या मदतीने त्याने पत्नीच्या बॉयफ्रेंडच्या डोक्यात जोरदार वार करून त्याचा खून केला. त्यानंतर सर्वांनी त्याचा मृतदेह जंगलात नेला आणि तिथल्या एका दरीत सरण रचून तो जाळून टाकला. पोलिसांना संशय येऊ नये, म्हणून त्याची बाईकदेखील त्यांनी दरीत ढकलून दिली. आपण खून करण्यात यशस्वी झालो आणि पत्नीला त्रास देणाऱ्या इसमाचा काटा बरोबर काढला, या समजुतीत तिचा पती मश्गूल होता. मात्र तेवढ्यात पोलिसांना या घटनेची खबर लागली. 

अधिक वाचा - LPG Subsidy : LPG सबसिडी बंद केल्याने सरकारी तिजोरीत हजारो कोटी रुपये, एका वर्षात सिलिंडरच्या किंमती एक हजार रुपयांच्या वर

गुराख्यांमुळे फुटले बिंग

जंगलात ज्या परिसरात मृतदेह पेटवून देण्यात आला, त्या परिसरात दुसऱ्या दिवशी काही गुराखी गुरं चारण्यासाठी आले होते. त्यांनी मृतदेह जळत असल्याचं पाहून ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी मृतदेहाची डीएनए चाचणी करून तपास केला. त्याचवेळी एक तरुण शेजारच्या गावातून गायब असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. हाच तोच तरुण असल्याचं पोलीस तपासात सिद्ध झालं.

अधिक वाचा - CISCE ISC 12th Result 2022: सीआयएससीई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी प्रथम

पोलीस कारवाई सुरू

पोलिसांनी महिलेचा पती आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला असून दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी