Marriage With Own Cousin :  मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत केले चुलत बहीणीशी लग्न, गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणाने सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्याच चुलत बहीणीशी लग्न केले आहे. हुंडा आणि पैश्यांचा आमिषाने या तरुणाने आपल्या चुलत बहीणीशी लग्न केले आहे. man marry own cousin sister for dowry and money up

marriage
लग्न 
थोडं पण कामाचं
  • तरुणाने सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्याच चुलत बहीणीशी लग्न केले
  • वर दोन मुलांचा बाप
  • सामूहिक विवाह सोहळ्यातील संबंधित अधिकार्‍यांना नोटीस

Marriage With Own Cousin : लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणाने सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्याच चुलत बहीणीशी लग्न केले आहे. हुंडा आणि पैश्यांचा आमिषाने या तरुणाने आपल्या चुलत बहीणीशी लग्न केले आहे. पोलिसांना याबाबत कळाल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सामूहिक विवाह सोहळ्यातील संबंधित अधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. (man marry own cousin sister for dowry and money up)

दोन मुलांच्या बापाने केले चुलत बहीणीशी लग्न

फिरोजाबादमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजने अंतर्गत ५१ जोडप्यांनी लग्न केले. राज्य सरकारकडून हुंड्याचे सामान आणि पैसे नवविवाहित जोडप्यांना देण्यात आले होते. शनिवारी हा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. तेव्हा ज्या जोडप्यांची लग्न झाली त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर महेंद्र सिंह हा दोन मुलांचा बाप असून त्याने आपल्याच चुलत बहीणीशी लग्न केल्याचे समोर आले. इतकेच नाही तर सरकारकडून मिळालेले गिफ्ट्स आणि पैसेही घेतले होते. 

पैशांच्या आमिषाने केले लग्न

सामूहिक लग्नासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोड्या निवडल्या जातात. त्यासाठी वधू आणि वराचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बँकेचे पासबूक यांची तपासणी केली जाते. या जोडप्याचीही माहिती गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी पाहिली होती. त्यानंतरही या दोघांचे लग्न झाले. जेव्हा हे वधू आणि वर चुलत भावंड असल्याचे समोर आले तेव्हा जिल्हा प्रशासनाने या अधिकार्‍यांना नोटीस पाठवली आणि चुकीचे स्पष्टीकरण मागवले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी