Crime | शेअर मार्केटच्या सवयीने बनवले खूनी, कर्जाच्या परतफेडीसाठी किडनॅप करून केला भावाचा खून

Kidnapping & Murder : एका व्यक्तीने आपल्याच मावस भावाचा खून (murder)केला आहे. यामागचे कारण धक्कादायकच आहे. या व्यक्तीला शेअर बाजारात पैसे लावून ट्रेडिंग (share market trading) करण्याचे व्यसन लागले होते. या प्रकारात तो पूर्णपणे दिवाळखोर झाला होता. त्याच्यावर कर्ज झाले होते. या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी त्याने आपल्याच मावस भावाचे अपहरण (cousin brother kidnapping) करून खंडणी करण्याचे ठरवले होते.

Kidnapping & Murder
अपहरण आणि खून 
थोडं पण कामाचं
  • राजस्थानातील एका व्यक्तीला शेअर बाजाराचे लागले व्यसन
  • व्यसनामुळे गमावले पैसे आणि झाले मोठे कर्ज
  • कर्जाची परतफेड करण्यासाठी केला मावस भावाचाच खून

Share Market Addiction | चितोडगढ : राजस्थानातील चित्तोडगढ (Chittorgarh)जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्याच मावस भावाचा खून (murder)केला आहे. यामागचे कारण धक्कादायकच आहे. या व्यक्तीला शेअर बाजारात पैसे लावून ट्रेडिंग (share market trading) करण्याचे व्यसन लागले होते. या प्रकारात तो पूर्णपणे दिवाळखोर झाला होता. त्याच्यावर कर्ज झाले होते. या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी त्याने आपल्याच मावस भावाचे अपहरण (cousin brother kidnapping) करून खंडणी करण्याचे ठरवले होते. त्यातूनच पुढे हा खून झाला. (In Rajasthan Man murdered cousin brother to pay the loan due to share market)

अटक झाल्यावर सत्य आले समोर

चित्तोडगढ येथील कनेरा पोलिस स्टेशन परिसरातील सरसी येथून एका बेपत्ता युवकाचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी मिळाला होता. पोलिसांनी आज या प्रकरणात खुलासा केला. पोलिसांनी या प्रकरणात मृतकाच्याच मावस भावाला अटक केली आहे. पोलिस इन्स्पेक्टर गोपालनाथ यांनी सांगितले की सरसी गावातील निवासी असलेला प्रल्हाद ऊर्फ मनोज धाकड १५ डिसेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा सडलेला मृतदेह २२ डिसेंबरला गावातीलच एका विहिरीतून मिळाला होता. पोलिसांनी या प्रकरणात तपास केला असता जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती. मृतदेह मिळताच मृतकाचा मावस भाऊ शिवलाल गायब झाला होता. त्याला आज राजस्थान-मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती जंगलातून पकडून त्याची चौकशी करण्यात आली.

विहिरीत फेकला मृतदेह

शिवलालने आपल्या मावस भावाच्या अपहरणाचा आणि खूनाचा गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की त्याला शेअर बाजाराचे व्यसन लागले होते. यात तो पूर्णपणे बरबाद झाला होता. तो कर्जात बुडाला होता. या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी त्याने आपल्या मावस भावाचे म्हणजे प्रल्हादचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा प्लॅन बनवला होता. १५ डिसेंबला त्याने आपल्या भावाला बोलावून त्याला कडुलिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने बांधून टाकले. मात्र त्याला कुठे लपवायचे हा प्रश्न होता. जागा न मिळाल्याने शिवलाल घाबरला. यानंतर त्याने भावाचा खून करून खंडणी मागण्याची योजना बनवत त्याच रात्री दोरीने गळा दाबून त्याचा खून केला. प्लास्टिकच्या मोठ्या पिशवीत मृतदेह गुंडाळून त्याला मोठा दगड बांधून तो मृतदेह विहिरीत फेकून दिला. त्यानंतर गावातील परिस्थिती पाहून त्याची खंडणी मागण्याची हिंमतच झाली नाही.

खून्याला रिमांडवर घेणार पोलिस

यानंतर मृतकाचे कुटुंबिय आणि गावातील लोक त्याला शोधू लागले होते. मात्र मृतदेह मिळाल्यानंतर शिवलाल पकडले जाण्याच्या भीतीने फरार झाला आणि जंगलात जाऊन लपला. पोलिसांनी सांगितले की अपहरण आणि खूनाच्या आरोपाखाली शिवलालला अटक करण्यात आली आहे. मात्र पोलिसांना या घटनेत आणखी लोकांच्या सहभागाची शंका आहे. त्यामुळे पोलिस शिवलालला कोर्टात हजर करून त्याची पोलिस कस्टडी घेणार आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी