Cold blooded murder : आजारी लेकीला मारहाण करणाऱ्या जावयाचा सासऱ्याने काढला काटा, असा केला खून

आपल्या मुलीला सतत मारहाण करणाऱ्या जावयाचा सासऱ्यानेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Cold blooded murder
लेकीचा छळ करणाऱ्या जावयाची सासऱ्याकडून हत्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जावई करायचा लेकीचा छळ
  • सासऱ्याने केला जावयाचा खून
  • सासऱ्याला पोलिसांकडून अटक

Cold blooded murder: आपल्या लेकीचा (Daughter) सतत छळ करणाऱ्या जावयाचा (Son in law) त्याच्या सासऱ्याने (Father in law) खून (Murder) केल्याची घटना उघडकीला आली आहे. आपल्या जावयाला अनेकदा समजावून सांगूनही तो ऐकत नसल्याचा राग सासऱ्याच्या मनात होता. त्याने वारंवार आपल्या मुलीला जावयाच्या त्रासापासून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरपर्यंत जावयाने न ऐकल्याने अखेर त्याच्या खुनाचा बेत सासऱ्याने आखला आणि तडीस नेला. ही घटना घडलीय आंध्रप्रदेशमधील एका गावात. 

अशी घडली घटना

आंध्रप्रदेशमधील चित्तूर भागात राहणाऱ्या साईबाबा नावाच्या तरुणाचं हसीना नावाच्या तरुणीसोबत 10 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नापूर्वी दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनाही आपापल्या कुटुंबीयांना या लग्नासाठी तयार केलं आणि विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. हसीनाच्या कुटुंबीयांचा अगोदर या लग्नाला विरोध होता, मात्र मुलीची इच्छा पाहून त्यांनी अखेर लग्नाला होकार दिला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस दोघांनी सुखाचा संसार केला, मात्र काही दिवसांतच दोघांमध्ये वाद आणि भांडणांना सुरुवात झाली. 

सततची भांडणं आणि मारामारी

हसीना आणि साईबाबा यांच्यात सतत वाद होऊ लागले. हळूहळू या वादांचं रुपांतर कडाक्याच्या भांडणात व्हायचं आणि साईबाबा हसीनाच्या अंगावर हात उचलत असे. त्यात हसीनाची तब्येत सतत बरी नसायची. त्यामुळे बहुतांश वेळा आजारी असतानाच हसीनाला मारहाण केली जायची. काही काळ हसीनाने हा अत्याचार एकटीने सहन केला. मात्र हा प्रकार असह्य झाल्यावर तिने आपल्या वडिलांना याची कल्पना दिली. 

अधिक वाचा - Vande Bharat: वंदे भारत ट्रेनमध्ये लागणार FRPच्या या खास सीट्स, विंडोसीटचा सर्व प्रवाशांना घेता येणार आनंद

वडिलांनी दिली समज

आपल्या मुलीला जावयाकडून मारहाण होत असल्याचं समजल्यावर वडिलांचा पारा चढला आणि त्यांनी थेट जावयाची गाठ घेतली. त्याला भेटून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलीला मारहाण न करण्याची विनंती केली. मात्र त्याचा साईबाबावर काहीच परिणाम झाला नाही. त्याने हसीनाला मारहाण करणं सुरुच ठेवलं. काही दिवसांनी पुन्हा एकदा सासऱ्यांनी त्याची समजूत काढत आपल्या मुलीला मारहाण न करण्याचा इशारा दिला. मात्र त्याचाही परिणाम साईबाबावर झाला नाही. हसीनाला वेळोवेळी मारहाण करणं त्याने सुरूच ठेवलं.

अधिक वाचा - Owaisi on Modi : श्रीलंकेच्या राष्ट्रपतींप्रमाणे आता जनता आपल्या पंतप्रधानांच्या घरात घुसेल, ओवेसींची मोदी सरकारवर कडाडून टीका

सासऱ्याने केला जावयाचा खून

जावई असणारा साईबाबा वारंवार विनंती करूनही ऐकत नसल्यामुळे संतापलेल्या त्याच्या सासऱ्याने जावयाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. एक दिवस तो चाकू घेऊन जावयाच्या घरी गेला आणि त्याच्याशी भांडण करू लागला. आपल्या मुलीला न मारण्याची धमकी देऊ लागला. तेव्हा जावयाने उद्धट उत्तर दिल्यामुळे रागाचा पारा चढलेल्या सासऱ्याने जावयाचा गळा चिरून त्याचा खून केला. या घटनेत साईबाबाचा जागीच मृत्यू झाला. 

अधिक वाचा - Breaking News 01 August 2022 Latest Update : शिवसेना इतिहासजमा होणार- भाजप नेते किरीट सोमय्या

पोलीस तपास सुरू

या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपी सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसानी साईबाबाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. या घटनेनं परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी