धक्कादायक पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ४० महिलांवर ब्लॅकमेल करून  रेप 

पोलिस अधिकाऱ्याची वर्दी घालून एका तोतयाने ४ डझन पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तो सर्वात प्रथम कपल्सला आपला शिकार बनवत होता. 

man-posed-as-cop-blackmailed-and-raped
पोलीस अधिकारी असल्याचे सांगून ४० महिलांवर ब्लॅकमेल करून  रेप  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • पोलिस अधिकारी सांगून एका ३५ वर्षीय व्यक्तीने कथीतपणे ४ डझन पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार केला आहे.
  • सुरूवातीला तो त्यांना ब्लॅकमेल करायचा त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा.
  • या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा  त्याने मनाली  येथील एका तरूणीचा एक व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. 

चेन्नई :  पोलिस अधिकारी सांगून एका ३५ वर्षीय व्यक्तीने कथीतपणे ४ डझन पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार केला आहे. सुरूवातीला तो त्यांना ब्लॅकमेल करायचा त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा  त्याने मनाली  येथील एका तरूणीचा एक व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. 

या प्रकरणाची चौकशी करताना धक्कादायक खुलासा झाला. चौकशीत समजले की त्यांनी एक नाही दोन नाही तब्बल ४ डझनपेक्षा अधिक महिलांना आपले शिकार बनवले आहे. तो व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे त्यांच्यावर वारंवार रेप करायचा. यात अधिकांश महिला पुजहल आणि रेल हिल्स भागातल्या होत्या.  

आरोपीची ओळख पटली असून पिचाईमनी असे त्याचे नाव आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे. त्यात अनेक महिलांचा व्हिडिओ आणि फोटो होते. यातील एका महिलेने हिंम्मत करून पुजहल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या विरूद्ध तक्रार दाखल केली. तीने आपल्या तक्रारीत म्हटले की, ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत होतीत तेव्हा एका पोलिस अधिकाऱ्याने तिचा फोन आणि १५ हजार रुपये हिसकावले. 

पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. पोलिसांनी त्या एरियातील सीसीटीव्ही फुटेज चेक केली. यात पीडित तरूणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. पीडित तरूणीने पोलसांना सांगितले की आरोपीने तिला आपल्या बॉयफ्रेंड सोबतचे प्रायव्हेट फोटो दाखवले. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करून एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. आरोपीने तिच्यावर त्याठिकाणी जबरदस्ती करून बलात्कार केला. त्यानंतर तिचे सामान घेऊन तेथून पळून गेला. 
दोन दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याने पोलिसांकडे आपला आरोप कबूल केला. तसेच त्यांनी इतर महिलांसोबतही असे केल्याचे सांगितले.  खाकी शर्ट आणि पँट घालू एका बाईकवर फिरत होतो. रेड हिल्स भागात फिरताना कपल्सला तो आपला निशाणा बनवायचा. सुरूवातीला कपल्सचा व्हिडिओ बनवायचा, त्यानंतर तो त्यांना टार्गेट करायचा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी