खारघर : नवी मुंबईतील खारघरमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कुत्रीवर बलात्कार करून तिला ओरल सेक्ससाठी भाग पाडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या तरूणाची ओळख पटली असून २० वर्षीय तरूणाचे नाव मुनमुन कुमार गुवोधन राम असे आहे. आरोपी एका फूड आऊटलेटमध्ये कामाला आहे, आरोपीला अटक केल्यानंतर गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले, त्याची रवानगी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली.
या संदर्भात तक्रार दिलेल्या विजय रंगारे यांनी सांगितले की, १५ ऑगस्टला आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले. रंगारे हे प्राणीमित्र कार्यकर्ते असून त्यांना ही घटना एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपने लक्षात आणून दिली. ते खारघरच्या सेक्टर ४ मध्ये आपल्या मित्राला भेटायला गेले होते. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने भटक्या कुत्रीवर बलात्कार केला आणि तिला ओरल सेक्स करण्यासाठी भाग पाडत होता. या संदर्भातील एक व्हिडिओ विद्यार्थ्यांनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. तसेच हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला. रंगारे यांनी हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी या संदर्भात पोलिसांना सूचना दिली.
व्हिडिओ पाहून पोलिसांनी विविध कलमांतर्गत बुधवारी गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी चौकशी केला असतात सेक्टर चारमधील संजू दा ढाबा या मालकाला हा व्हिडिओ दाखवला. त्याने व्हिडिओतील कर्मचारी हा त्यांच्या हॉटेलमधील मुनमुन कुमार असल्याचे ओळखले. पोलिसानी मुनमुनची चौकशी केली असता, त्या मुनमुन कुमार हा रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला द्यायचा. भटकी कुत्री हॉटेलच्या बाहेरच झोपायचे. कुत्रीवर अत्याचार केल्याची आरोपीने कबुली दिली आहे.
अशीच एक घटना चेन्नईमध्ये समोर आली होती. गेल्या फेब्रुवारीत घडलेल्या या घटनेत एका चहा स्टॉलचा मालक भटक्या कुत्र्यांवर बलात्कार करत होता. दारूच्या नशेत तो हे कृत्य करत असल्याचे उघड झाले होते. त्याच्या विरूद्ध पुरावा न सापडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.
भारतात अशा प्रकारचे गुन्हा घडत असतात पण त्यातील गुन्हेगारांना एका आठवड्याच्या शिक्षेनंतर सोडून देण्यात येते.