अनैतिक संबंधांचा संशय आला अन् 200 किमी प्रवास करत बसमध्येच पत्नीसोबत त्याने...

Crime News Marathi: अनैतिक संबंधांचा संशय असल्याने पतीने पत्नीसोबत असं काही केलं की....

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • गुजरातमधील धक्कादायक घटना
  • पतीला होता पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय 

Man slits wife throat: महाराष्ट्राच्या शेजारील गुजरात राज्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका पतीला आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून पतीने धक्कादायक असं कृत्य केलं आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी पतीने आपल्या पत्नीचा गळा कापून हत्या केली. प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये आरोपीने हे कृत्य केलं आहे. (man slits wife throat in bus after suspects having extra marital affairs crime news marathi)

इतकेच नाही तर या घटनेनंतर आरोपी हा बसमध्येच बसून राहीला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. तर त्याच्या पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

हे पण वाचा : डोळा फडफडणे शुभ की अशुभ?, काय आहेत संकेत?

अनैतिक संबंधांचा संशय

आरोपीचं नाव अमृत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हा गुजरात पोलिसांत कार्यरत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याला आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता आणि त्यामुळेच त्याने तिची हत्या केली. पत्नीची हत्या करण्यापूर्वी आरोपीने हत्येचं प्लॅनिंग केलं होतं आणि त्यानंतर तिला संपवलं.

हे पण वाचा : बेडवर कोणत्या राशीची व्यक्ती किती विचित्र वागते?

200 किमी प्रवास

मृतक महिला सुद्धा जॉब करत होती. गुजरात राज्य परिवहन निगममध्ये मृतक महिला कंडक्टर होती. ज्यावेळी महिलेची हत्या झाली त्यावेळी महिला ऑन ड्युटी होती. घटनेच्या दिवशी पती आणि पत्नी हे दोघेही एकत्रच घरातून बाहेर पडले होते. पत्नी कंडक्टर असल्याने ती आपल्या ड्युटीनुसार, बसमध्ये गेली तर पती पोलीस असल्याने तो आपल्या नोकरीसाठी निघाला. प्लॅनिंगनुसार, पती त्या रस्त्यावर पोहोचला ज्या मार्गावरुन पत्नी काम करत असलेली बस धावते. त्यासाठी पतीने तब्बल 200 किमीचा प्रवास सुद्धा केला.

हे पण वाचा : हिवाळ्यात सफरचंद खाण्याचे असंख्य फायदे

प्लॅनिगनुसार, तो भिखापूर गावातील बस स्थानकातून बस पकडली. त्याच बसमध्ये पती चढला. त्यानंतर चाकू घेऊन पत्नीजवळ पोहोचला. त्यानंतर पत्नीचा गळा कापला. इतकेच नाही तर त्याने पत्नीचा गळा कापल्यावर तिच्या अंगावर ठिकठिकाणी चाकूने वार केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी