Man vs Wild: ६८ वर्षीय मोदींची ४५ वर्षांच्या बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 12, 2019 | 23:53 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होणाऱ्या मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये ६८ वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४५ वर्षांच्या बेअर ग्रिल्ससोबत पहायला मिळाले. शूटिंग दरम्यान मोदी आणि ग्रिल्स या दोघांचं ट्यूनिंग खूपच चांगलं

Prime Minister Narendra Modi on Man vs Wild show
मॅन वर्सेस वाइल्ड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 

थोडं पण कामाचं

  • डिस्कव्हरी चॅनलवरील 'मॅन वर्सेस वाइल्ड' शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • 'मॅन वर्सेस वाइल्ड' शोमध्ये पहायला मिळालं मोदींचं वेगळं रूप
  • उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये झालं शोचं शूटिंग

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होणाऱ्या लोकप्रिय 'मॅन वर्सेस वाइल्ड' शोमध्ये पहायला मिळाले. या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होते बेअर ग्रिल्स. एक तासाच्या या शोमध्ये ६८ वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ४५ वर्षीय बेअर ग्रिल्स यांच्या जोडीचं ट्यूनिंग खूपच खास होतं. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेल्या या क्षणांच्या दरम्यान मोदींनी प्रकृती संदर्भात आपले आणि भारतीयांचे विचार ग्रिल्स याच्यासमोर ठेवले. यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये या शोचं शूटिंग करण्यात आलं होतं.

वाघांपासून संरक्षणासाठी बनवला भाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'जिम कार्बेट नॅशनल पार्क हे निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी एक शानदार ठिकाण आहे. ज्या नागरिकांना पर्यावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड आहे त्यांनी या सुंदर जागेला भेट यायला हवी.'  या ठिकाणी अनेक वाघ आढळतात त्या वाघांपासून सुरक्षित राहण्यासाठी ग्रिल्स आणि मोदींनी एक भाला बनवला. यावर ग्रिल्सने म्हटलं की, तुम्ही भारतातील सर्वात महत्वाचे व्यक्ती आहात. माझं काम आहे तुम्हाला सुरक्षित ठेवणं. यानंतर मोदींनी म्हटलं, माझे संस्कार कुणाचीही हत्या करण्याची परवानगी देत नाहीत.

मोदींनी सांगितली लहानपणाची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रिल्स याला आपल्या लहानपणासंदर्भात सांगितलं. मोदींनी सांगितलं कशाप्रकारे त्यांनी आपले लहानपण हिमालयात घालवलं आणि खूपच कमी वयामध्ये घरही सोडलं होतं. घर सोडल्यानंतर हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला. मोदींनी म्हटलं की, 'मी खूपच सकारात्मक आहे. माझा स्वभाव सकारात्मक आहे. आपण आयुष्यात नेहमीच पुढे जाण्याचा विचार केला पाहिजे'.

पावसाचं महत्व 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेअर ग्रिल्स याच्यासोबत भारताची संस्कृती, निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांचे मूल्य यांच्यासंदर्भात भाष्य करतानाच आपल्या आयुष्यातील एक किस्साही सांगितला. पंतप्रधान मोदींनी म्हटलं, 'प्रत्येक गावात पाऊस पडल्यानंतर माझे वडील हे सर्व नातेवाईकांकडे पोस्टकार्ड पाठवत असत. मी लहान होतो तेव्हा मला त्याचं महत्व कळालं नाही. मात्र, आता मला कळालं की माझ्या वडिलांकडे पैसे नसतानाही पोस्टकार्ड खरेदी का केले. मला आता पावसाची किंमत कळत आहे'.

एक आणखीन उदाहरण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल की, त्यांच्या आजीने आपल्या काकांना लाकडाचा व्यवसाय करु दिला नाही. कारण, आजीचं म्हणणं होतं की, प्रत्येक झाडात प्राण आहेत. मोदींनी म्हटलं की, 'भारतात प्रत्येक झाडाला एका परमेश्वराच्या रूपात पाहिलं जातं. आपण स्वार्थी कारणांमुळे आपल्याच प्रकृतीचं शोषण करतो आणि हा मुख्य चिंतेचा विषय आहे'.

१८० देशांमध्ये प्रसारण

डिस्कव्हरी चॅनलवरील लोकप्रिय शो असलेल्या मॅन वर्सेस वाइल्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक वेगळं रूप सर्वांना पहायला मिळालं. या शोचं प्रसारण १२ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता करण्यात आलं. हा शो जगभरातील १८० देशांमध्ये प्रसारित करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Man vs Wild: ६८ वर्षीय मोदींची ४५ वर्षांच्या बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी Description: डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होणाऱ्या मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये ६८ वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४५ वर्षांच्या बेअर ग्रिल्ससोबत पहायला मिळाले. शूटिंग दरम्यान मोदी आणि ग्रिल्स या दोघांचं ट्यूनिंग खूपच चांगलं
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता 
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
Baramulla Encounter: कलम ३७० लागू झाल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी- लष्करात चकमक 
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
काँग्रेस नेते चिदंबरम मुलामुळे गोत्यात? काय आहे, आयएनएक्स मीडिया केस?
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 
INX Media case: चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता