Crime News: मध्यरात्री टॉयलेटला गेला पती अन् परतल्यावर बेडवर पत्नी....

Crime News: डुंगरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक पुरुष मध्यरात्री टॉयलेटला गेला आणि तेथून परतल्यावर त्याने जे पाहिलं ते पाहून त्याला धक्काच बसला.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 

डुंगरपूर : राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील बावडी गावात राहणारा शांतीलाल डामोर हा व्यक्ती मध्यरात्री टॉयलेटला गेला होता. टॉयलेटहून परत आल्यावर त्याने आपल्या खोलीत जे काही पाहिलं त्यामुळे एकच खळबळ उडाली.

जिल्ह्यातील कुआ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथील बावडी गावात एका महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. तर या प्रकरणात मृतक महिलेच्या माहेरील नातेवाईकांनी तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

या प्रकरणात गोपाल परमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गोपाल परमार यांनी म्हटलं की, त्यांनी आपल्या मुलीचं लग्न बावडी येथील शांतीलाल डामोर याच्यासोबत लावून दिलं होतं. गेल्या रात्री आम्हाला तिच्या सासरच्यांचा फोन आला की, तुमच्या मुलीला काहीतरी झालं आहे आणि ती बोलत नाहीये. त्यानंतर आम्ही पहाटेच मुलीच्या सासरवाडीत दाखल झालो. तेथे पाहिलं तर आमची मुलगी बेडवर मृतावस्थेत आढळून आली.

हे पण वाचा : 10 सेकंदात शोधा गायींच्या कळपात लपलेला कुत्रा 

पती टॉयलेटला गेला होता 

मुलीच्या मृत्यू प्रकरणात आम्ही तिच्या पतीला विचारले असता त्याने सांगितले की, रात्री तो टॉयलेटला जाण्यासाठी उठला होता. टॉयलेटहून परत आल्यावर पाहिलं तर पत्नी बेशुद्धावस्थेत पडली होती, ती काहीही बोलत नव्हती.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतक महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाचा रिपोर्ट अद्याप आलेला नाहीये. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यावर मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे समोर येईल. या प्रकरणी आम्ही विविध अँगलने तपास करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी