Winter best destination: आपल्या जोडीदारासह करा बर्फाळ डोंगदरऱ्यांची सैर...सौंदर्याचा खजिना, सोबत जबरदस्त ऑफर्सदेखील

Honeymoon destination : हिमाचल प्रदेशातील सौंदर्य तर जगप्रसिद्ध आहे. खासकरून जोडपे किंवा नव्याने लग्न झालेले कपल्स हनीमूनसाठी हिमाचल प्रदेशकडे वळतात. त्यातही मनाली हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मनालीतील बर्फाच्छादित डोंगरदऱ्या तुमची सहल अविस्मरणीय करून टाकतात. त्यात आणखी भर म्हणून मनालीतील हॉटेल खास ऑफर्स देत आहेत.

Winter tourism
वेड लावणारे मनालीचे सौंदर्य  
थोडं पण कामाचं
  • हिमाचल प्रदेशातील सौंदर्य जगप्रसिद्ध
  • मनालीतील बर्फाच्छादित डोंगरदऱ्या तुमची सहल अविस्मरणीय करतात
  • इथे हनिमून जोडप्यांसाठी 25 ते 30 टक्के सूट दिली जाते

Perfect Honeymoon Destination : नवी दिल्ली : निसर्गरम्य आणि सुंदर ठिकाणे (Nature's Beauty) प्रत्येकालाच आवडतात. हिमालयाच्या डोंगररांगा मनाला मोहून टाकतात. हिमाचल प्रदेशातील सौंदर्य तर जगप्रसिद्ध आहे. खासकरून जोडपे किंवा नव्याने लग्न झालेले कपल्स हनीमूनसाठी हिमाचल प्रदेशकडे (Himachal Pradesh Tourism) वळतात. त्यातही मनाली (Manali) हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मनालीतील बर्फाच्छादित डोंगरदऱ्या तुमची सहल अविस्मरणीय करून टाकतात. त्यात आणखी भर म्हणून मनालीतील हॉटेल खास ऑफर्स देत आहेत. हनिमून जोडप्यांसाठी (Honeymoon couple) 25 ते 30 टक्के सूट दिली जाते आहे. ही ऑफर 14 डिसेंबरपर्यंत आहे. मनालीमध्ये अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्यात बर्फाच्छादित सोलंग नाला, गुलाबा, अटल बोगदा रोहतांग पार करून, तुम्ही लाहुल व्हॅलीला भेट देऊ शकता. (Manali is the best Honeymoon Destination In Winter) 

अधिक वाचा : म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

तुम्ही तीन चार दिवसांचा टूर आखून मनालीचा मस्त प्लॅन करू शकता. हे उत्तर भारतातील आवडते हनिमून डेस्टिनेशन आहे. त्यातच तिथे सध्या बर्फवृष्टी होत असल्याने हनिमून कपल्सची गर्दी वाढली आहे. मनाली हे हिमाचलचे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. 

हॉटेलच्या बाहेर बर्फाची चादर

हिमालय म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतो तो पांढरा शुभ्र बर्फ. त्यामुळेच हिवाळ्यात येथे भेट देण्याचा फायदा म्हणजे पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्सभोवती बर्फ पाहायला मिळतो. आता येथील पर्यटन अधिक सुलभ झाले आहे. कारण पूर्वीपेक्षा उत्तम मशीन्स आहेत. बर्फवृष्टी झाल्यास, राष्ट्रीय महामार्ग त्वरित पूर्ववत केला जातो, ज्यामुळे रहदारीची सोय होते. मनालीमध्ये तर निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. शिवाय इथे भेट देण्यासाठी डझनभर सुंदर पर्यटन स्थळे आहेत.

अधिक वाचा : जेवणानंतर गुळ खावा की नाही?

कसे पोचाल

कुल्लू मनालीला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला दिल्ली गाठावी लागेल. दिल्लीहून विमानाने भुंतरला जाता येते. जर तुमच्याकडे वेळ जास्त असेल किंवा विमान प्रवास बजेटमध्ये नसेल तर दिल्ली ते मनाली ही थेट व्होल्वो बस सेवा आहे. व्होल्वो बसने दिल्लीहून संध्याकाळी निघाले की तुम्ही सकाळी मनालीला असाल. रस्त्यांची अवस्था चांगली असल्याने आता वाहनांचा प्रवासही सुखकर झाला आहे.

सर्वप्रकारच्या हॉटेलचा पर्याय

कुल्लू मनालीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारच्या हॉटेल्स पर्याय उपलब्ध आहे. तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार तुम्हाला हॉटेलमध्ये राहण्याचा आनंद घेता येईल. इथे 2000 ते 20000 पर्यंतच्या रुम पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक रुममध्ये गरम उपकरणे दिलेली असतात. 

अधिक वाचा - थंडीत खा हे 5 पदार्थ आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवा

इथे तुम्हाला 10 हजार फूट उंचीवर बांधलेला जगातील आधुनिक आणि अद्वितीय अटल बोगदा रोहतांग सहज पाहता येतो. याशिवाय उत्तर आणि दक्षिण पोर्टल, सिस्सू, धुंदी, सोलांग नाला, अंजनी महादेव, फतरू, कोठी आणि गुलाबा, हिडिंबा मंदिर, मनू मंदिर, वशिष्ठ मंदिर आणि गरम पाण्याचा तलाव, जोगनी धबधबा, हमटा येथे हिवाळ्यात भेट देता येईल. 

25 ते 30 टक्के सूट

हिमाचल प्रदेश टुरिझम कॉर्पोरेशन हॉटेल्स पर्यटकांना 14 डिसेंबरपर्यंत 20 टक्के सवलत देत आहेत. तर हनिमून जोडप्यांसाठी 25 ते 30 टक्के विशेष सूट दिली जाते आहे. हॉटेल्सनी हनिमून कपल्ससाठी खास व्यवस्था केली आहे. जोडप्याची खोली फुलांनी सजवलेली असते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी