Manipur ambush : 'कर्नल कुटुंबासोबत होते हे माहिती नव्हतं',सुरक्षा दलांनी अशा भागात कुटुंबीयांना सोबत आणू नये - MNPF दहशतवादी संघटना

Manipur ambush : मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यातल्या सिनघाट सब-डिव्हिजनमध्ये '४६ आसाम रायफल्स'वर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर (Commanding Officer) कर्नल बिप्लब त्रिपाठी (Colonel Biplab Tripathi) यांना वीरमरण आले.

we did not know that the colonel was with the family MNPF militant gr
सुरक्षा दलांनी अशा भागात कुटुंबीयांना सोबत आणू नये - MNPF   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भारतीय सुरक्षा दलांनी अशा अशांत भागात आपल्या कुटुंबीयांना सोबत आणू नये.
  • कमांडिगं ऑफिसरची पत्नी आणि मुलगा यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू.
  • बंडखोरांनी म्यानमार सीमेवरून भारतात घुसखोरी केल्याचा संशय

Manipur ambush : नवी दिल्लीः मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यातल्या सिनघाट सब-डिव्हिजनमध्ये '४६ आसाम रायफल्स'वर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर (Commanding Officer) कर्नल बिप्लब त्रिपाठी (Colonel Biplab Tripathi) यांना वीरमरण आले. कमांडिगं ऑफिसरची पत्नी आणि मुलगा यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी मणिपूर पीएलएने (Manipur PLA) आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंट (Manipur Naga People's Front) (MNPF) यांनी स्वीकारली आहे. 

आपल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कर्नल आणि त्याच्या कुटुंबासह ७ जण मारले गेले, असं दोन्ही अतिरेकी संघटनांनी जारी केलेल्या एका पत्रकातून दावा केला आहे. कर्नलची पत्नी आणि मुलगा त्यांच्यासोबत पथकात होते याची कल्पना नव्हती, असं अतिरेकी संघटनांनी म्हटले आहे.भारतीय सुरक्षा दलांनी अशा अशांत भागात आपल्या कुटुंबीयांना सोबत आणू नये, असे दहशतवादी संघटनांनी आपल्या नोटमध्ये म्हटले आहे. दहशतवाद्यांनी लिहिली पहिली नोट, उप प्रचार सचिव रोबेन खुमान आणि थॉमस नुमाई यांनी संयुक्तिकपणे हे म्हटलं आहे. 

संपूर्ण कुंटुबाची हत्या

चुराचंदपूर जिल्ह्यातील सियालसी गावाजवळ लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिप्लब त्रिपाठी हे बिहंग को-पोस्टवरून परतत असताना सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात कर्नल बिप्लबसह त्यांची पत्नी अनुजा आणि पाच वर्षांचा मुलगा अबीर यांचाही मृत्यू झाला. चुराचंदपूर जिल्ह्यातील सिंगत उपविभागात झालेल्या हल्ल्यात चार जवानही शहीद झाले. कर्नल बिप्लब त्रिपाठी नेहमीप्रमाणे चेक पोस्टची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते. हा त्याच्या दिनक्रमाचा भाग होता. पण शनिवारी त्यांचे कुटुंबही सोबत होते. अतिरेक्यांनी आधी स्फोट करत कर्नल बिप्लब त्रिपाठी यांच्या ताफ्यातील पहिली गाडी स्फोटाने उडवली आणि नंतर गोळीबार केला. त्यावेळी कर्नल बिप्लब त्रिपाठी हे त्यांची पत्नी अनुजा आणि मुलासोबत गाडीत होते. या हल्ल्यात संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली. कर्नल बिप्लब त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान या प्रकरणाविषयी बोलताना एक अधिकारी म्हणाले, कुटुंबातील सदस्यांनाही लक्ष्य करण्यात आलेली अशी घटना उत्तर-पूर्वेमध्ये बऱ्याच काळानंतर घडली आहे. सर्व बंडखोरांनी म्यानमार सीमेवरून भारतात घुसखोरी केली असावी. या हल्ल्यामुळे सर्वसाधारणपणे ईशान्येतील बंडखोर गटांशी सामना करण्याच्या रणनीतीचा पुनर्विचार करावा लागेल. अतिरिकी संघटनांनी अतिशय सुनियोजित पद्धतीने हल्ला केला होता. म्यानमारमध्ये AK-47 असॉल्ट रायफल, मशीन गन, अँटी-टँक माइन्स आणि ग्रेनेड्स यांसारखी अवैध चिनी बनावटीची शस्त्रे येत आहेत. सीमेवरील बंडखोर संघटनांना त्यांची मदत होत आहे. भारतीय सुरक्षा दलांसाठी ही घटना धोक्याची घंटा आहे, असे भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी