Manish Sisodia : नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपमध्ये सामील व्हा त्यानंतर सीबीआय आणि ईडीच्या धाडी बंद होतील अशी भाजपने आपल्याला ऑफर दिल्याचे सिसोदिया यांनी सांगितले आहे. परंतु भाजपला जे काही करायचे असेल ते करा आपण घाबरणार नाही असे सिसोदिया म्हणाले आहेत. मनीष सिसोदिया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी अबकारी धोरणाबद्दल सीबीआयने धाड टाकली होती. तसेच सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. (manish sisodia allegation on bjp joining party ed cbi case will close)
मुझे Offer देने वालों ने कहा कि — AAP (@AamAadmiParty) August 22, 2022
West Bengal में Suvendu Adhikari को हमने ही BJP में Join कराया था
Assam में Himanta Sarma से लेकर Baijayant Panda और Narayan Rane तक, सबको उन्होंने ही Join कराया
तो इन लोगों से पूछा जा सकता है कि इनको किसने Join कराया था?
-श्री @msisodia pic.twitter.com/kp3xj4l2Ik
सिसोदिया यांनी ट्विट करून म्हटले आहे की, जर तुम्ही आप पक्ष फोडून भाजपमध्ये आल्यास सीबीआय आणि ईडीच्या सर्व केस बंद करू अशी भाजपने आपल्याला ऑफर दिली आहे. पण मी महाराणा प्रताप यांच्या वंशांजाचा आहे. मी एक माझे मुंडके उडवून घेईन परंतु भ्रष्टाचार करणार्या आणि षडयंत्र रचणार्यांसमोर झुकणार नाही, माझ्या विरोधातील सर्व केसेस खोटे आहेत, भाजपला जे करायचे आहे ते करा असे आव्हानही सिसोदिया यांनी दिले आहे.
मेरे पास भाजपा का संदेश आया है- “आप” तोड़कर भाजपा में आ जाओ, सारे CBI ED के केस बंद करवा देंगे — Manish Sisodia (@msisodia) August 22, 2022
मेरा भाजपा को जवाब- मैं महाराणा प्रताप का वंशज हूँ, राजपूत हूँ। सर कटा लूँगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियोंके सामने झुकूँगा नहीं। मेरे ख़िलाफ़ सारे केस झूठे हैं।जो करना है कर लो
मुझे Offer दिया गया कि अगर मैं आम आदमी पार्टी को तोड़ दूं तो मेरे ऊपर लगे CBI-ED के सारे Case वापस ले लिए जाएंगे और मुझे मुख्यमंत्री बना देंगे। — AAP (@AamAadmiParty) August 22, 2022
BJP को मेरा जवाब: Kejriwal जी मेरे राजनीतिक गुरु हैं। मैं राजनीति में सिर्फ़ देश के हर बच्चे को शानदार शिक्षा देने आया हूं।
-@msisodia pic.twitter.com/pX3DJ8AeTi
सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या घरावर धाड घातल्याने नंतर दारू घोटाळ्यासंबंधित सर्व कागदपत्र जप्त केली होती. सीबीआयने ही कागदपत्रं ईडीकडे सोपवली आहेत. आता ईडी या प्रकरणी तपास करून पुढील कारवाई करणार आहे.
केंद्र, LG, Agencies का अफ़सरों पर दबाव था इसलिए उन्होंने New Policy के तहत दुकानों की नीलामी से मना कर दिया — AAP (@AamAadmiParty) August 22, 2022
हमारे पास पुरानी Policy के अलावा कोई Option नहीं था। अगर हम ऐसा ना करते तो सारी दुकानें बंद हो जाती और Gujarat की तरह नक़ली शराब बिकनी शुरू हो जाती
-श्री @ArvindKejriwal pic.twitter.com/t0ISuEdy0D
केंद्रीय तपासयंत्रणा सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात खटला दाखल चालवण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूरी दिली होती. राष्ट्रपती मुर्मू यांनी परवानगी दिल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआय दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणातील अनियमिततांबद्दल तपास करत आहे. कुठल्याही केंद्रशासित प्रदेशच्या आमदाराची चौकशी करण्यासाठी राष्ट्रपतींची मंजूरी घ्यावी लागते.
अधिक वाचा : OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची सुनावणी पाच आठवडे पुढे ढकलली
सिसोदिया यांच्या घरात सीबीआय ने धाड घातल्याने कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सीबीआय आणि ईडी सक्त कारवाई करत असून सखोल चौकशी करत आहेत. असे असले तरी अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक केलेली नाही.
अधिक वाचा : भारत ३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करणार अमेरिकेचे प्रीडेटर ड्रोन?