Sisodia Arrested: दिल्ली: दिल्लीचे (Delhi) उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि मुख्यमंत्री (Chief Minister)अरविंद केजरीवाल( Arvind Kejriwal) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने अटक केली आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. सीबीआयने आज सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. जवळपास 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर सिसोदियांना अटक करण्यात आली आहे. (Why did CBI arrest Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia? Find out what the case is )
अधिक वाचा : Images द्वारे पाठवा मराठी राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा संदेश
तत्पूर्वी, सीबीआयने सिसोदिया यांचे निकटवर्तीय दिनेश अरोरा, साऊथ लॉबीचे कथित सदस्य आणि पॉलिसी मिळविलेल्या राजकारणी आणि मद्यविक्रेत्यांच्या गटाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांची सविस्तर चौकशी केली. दिल्ली सरकारच्या धोरणाचा काही व्यापाऱ्यांना फायदा झाल्याचा सिसोदियांवर आरोप आहे. यासाठी या लोकांनी लाच दिल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
अधिक वाचा : Daily Horoscope : जाणून घ्या कोणत्या राशीसाठी आठवड्यातील पहिला दिवस असेल भारी
सिसोदियांना सकाळी 11.10 वाजता सिसोदिया सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. याआधीही गेल्या रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र अर्थसंकल्पाच्या तयारीचा हवाला देत ते पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांना 26 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान चौकशी झाल्यानंतर सिसोदिया यांना अटक करण्यात आली. दरम्यान, सिसोदिया यांच्या अटकेचा आम आदमी पक्षाने निषेध केला आहे. सिसोदिया यांना अटक करण्यात आली पण ही कारवाई का झाली, काय घोटाळा आहे, याची माहती जाणून घेऊ..
अधिक वाचा : मराठी राजभाषा दिनानिमित्त पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा संदेश