Mann Ki Baat:स्वातंत्र्याची 75 वर्षानिमित्त पंतप्रधान मोदींचं तिरंग्याबाबत नागरिकांना विशेष आवाहन

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा मन की बात (Man Ki Baat) कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधत असलेला मन की बातचा हा 91 वा भाग होता. यावेळी पंतप्रधान मोदी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाबद्दल बोलत होते. पीएम मोदी म्हणाले, "यावेळची 'मन की बात' खूप खास आहे. याचे कारण म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहे. आपण सर्वजण एका अतिशय अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत.

Tricolor should be kept on DP till August 15- PM Modi's appeal
15 ऑगस्टपर्यंत DP वर तिरंगा ठेवावा- PM Modi चं आवाहन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान मोदींनी आज पुन्हा देशवासियांना संबोधित केले
  • मन की बात कार्यक्रमाचा हा 91 वा भाग

PM Modi Mann Ki Baat Updates:  पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा मन की बात (Man Ki Baat) कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधत असलेला मन की बातचा हा 91 वा भाग होता. यावेळी पंतप्रधान मोदी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाबद्दल बोलत होते. पीएम मोदी म्हणाले, "यावेळची 'मन की बात' खूप खास आहे. याचे कारण म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहे. आपण सर्वजण एका अतिशय अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. 31 जुलै या दिवशी आपण सर्व देशवासियांनो, शहीद उधम सिंह यांच्या हौतात्म्याला नमन करतो. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या इतर सर्व महान क्रांतिकारकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. 

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी खेळामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचं कौतुक केलं. मोदी म्हणाले,  मित्रांनो, वर्ग असो की क्रीडांगण, आज आपले तरुण प्रत्येक क्षेत्रात देशाचा गौरव करत आहेत. या महिन्यात पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनचे पहिले विजेतेपद पटकावले आहे. नीरज चोप्रानेही आपली सर्वोत्तम कामगिरी सुरू ठेवत जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी रौप्यपदक पटकावले आहेआयर्लंड पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनलमध्येही आपल्या खेळाडूंनी 11 पदके जिंकून देशाचा गौरव केला आहे. रोम येथे झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. 

Ready Also : 1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम

13 ते 15 तारखेपर्यंत 'हर घर तिरंगा' विशेष मोहीम

पंतप्रधान पुढे म्हणाले की, प्रिय देशवासियांनो, आज आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असताना, देशाच्या प्रवासासह आपण आपल्या चर्चेची सुरुवात केली होती. “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरूप येत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे.

समाजाच्या सर्व स्तरातील आणि प्रत्येक घटकातील लोक याशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.'' पंतप्रधान म्हणाले, ''आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 13 ते 15 तारखेपर्यंत 'हर घर तिरंगा' या विशेष चळवळीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read Also : शिंदे गटातील नेत्यानं संजय राऊतांविषयी वर्तवली 'ही' शक्यता

15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येत आहे. या आंदोलनाचा एक भाग बनून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तुम्ही तुमच्या घरी तिरंगा फडकावा किंवा तुमच्या घरी लावा. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आपण सर्वजण आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चरमध्ये तिरंगा लावू शकतो.आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या घरांवर आपला लाडका तिरंगा फडकविण्यासाठी देखील आपल्याला एकत्र यायचे आहे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही कसा साजरा केलात, कोणत्या विशेष गोष्टी केल्या या सर्वांची माहिती मला जरूर कळवा. असं मोदी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी