मन की बात: भारत जोडो अभियान चालवा; 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' या मंत्राने पुढे जावे लागेल - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) रेडिओच्या माध्यमातून 'मन की बात' (Mann Ki Baat ) व्दारे देशातील जनतेशी संवाद साधला.

Mann Ki Baat : run the Bharat Jodo Abhiyan
मन की बात: 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' मंत्र जपा - मोदी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारत जोडो अभियान चालवावे लागेल. 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' हा मंत्र घेत पुढे जावे लागणार - पंतप्रधान मोदी
  • देशभरात नाविन्यपूर्ण कामे करणाऱ्या लोकांचे कौतुक
  • ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सैनिक संघटीत झाले होते त्याच प्रकारे आपल्याला देशाच्या विकासासाठी एक होणे आवश्यक - मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) रेडिओच्या माध्यमातून 'मन की बात' (Mann Ki Baat ) व्दारे देशातील जनतेशी संवाद साधला. पंतप्रधानांचा हा आजचा 79 वा भाग आहे. प्रसार भारतीने आतापर्यंत आपल्या अखिल भारतीय रेडिओ, दूरदर्शन नेटवर्क आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'मन की बात' कार्यक्रमाचे 78 भाग प्रसारित केले आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यास सांगितले आहे. तसेच स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट'चा नारा दिला. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या भारत छोडो अभियानाच्या धर्तीवर देशातील जनतेने भारत जोडो अभियान चालवावे असे ते म्हणाले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना पाहून संपूर्ण देश रोमांचित झाला होता. संपूर्ण देशाने त्यांना 'तुमचा विजय हो.' अशी प्रार्थना केली होती. आज त्यांच्याकडे तुमच्या प्रेमाची आणि समर्थनाची शक्ती आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या समर्थनासाठी विजय पंच मोहीम सुरू झाली आहे, असे मोदी यांनी सांगितले.  आता आपल्याला भारत जोडो अभियान चालवावे लागेल. 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' हा मंत्र घेत पुढे जावे लागणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. कार्यक्रमात मोदींनी आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडूसह देशभरात नाविन्यपूर्ण कामे करणाऱ्या लोकांचे कौतुक केले. 'व्होकल फॉर लोकल'चा संदेश देत त्यांनी लोकांना हातमाग आणि खादी वापरण्याचे आवाहन केले आहे. मोदी पुढे म्हणाले की, जो देशासाठी तिरंगा उचलतो, देशप्रेमाची ही भावना आपल्याला जोडून ठेवते. उद्या कारगिल विजय दिवस असून तो आमच्या सैन्याचा शौयाचा प्रतीक आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी ती कथा वाचली पाहिजे अशी माझी इच्छा असल्याचे ते म्हणाले.

भारत देशाला येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र मिळून 75 वष होणार आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी भाग्याची असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ज्या स्वातंत्र्यांसाठी देशाने शतकानुशतके प्रतीक्षा केली आज आपण त्याचा 75 वा स्वातंत्र दिन साजरा करत आहे. तुम्हाला आठवत असेल की स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी 12 मार्च रोजी बापूंच्या साबरमती आश्रमातून 'अमृत महोत्सव' सुरू झाला आहे. या कार्यक्रमाव्दारे जम्मू-काश्मीर ते पुडुचेरी, गुजरात ते ईशान्य पर्यंत अमृत महोत्सवाशी संबंधित कार्यक्रम देशभर सुरू आहेत.

अमृत महोत्सव हा कोणत्याही सरकारचा कार्यक्रम नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, तो प्रत्येक भारतीय नागरिकांचा कार्यक्रम आहे. प्रत्येक स्वतंत्र आणि कृतज्ञ भारतीय आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहतो. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मार्गावर चालणे, त्यांच्या स्वप्नांचा देश बनविणे हीच भावना असून हाच त्यांचा या उत्सवाचा सार असल्याचे मोदी म्हणाले. ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सैनिक संघटीत झाले होते त्याच प्रकारे आपल्याला देशाच्या विकासासाठी एक होणे आवश्यक आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी