Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2021 च्या वर्षातील अखेरची करणार 'मन की बात'; पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचे लक्ष

Pm Modi Mann Ki Baat : पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज सकाळी 11 वाजता मन की बातमधून (Mann ki Baat ) देशवासियांना संबोधित करणार आहेत. या वर्षातील ही शेवटची मन की बात असणार आहे.

Narendra Modi
मन की बात : 84 व्या भागात काय बोलणार पंतप्रधान मोदी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती.
  • डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 84वा भाग.
  • या वर्षाच्या शेवटच्या मन की बातमध्ये काय बोलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mann ki Baat : नवी दिल्ली : पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज सकाळी 11 वाजता मन की बातमधून (Mann ki Baat ) देशवासियांना संबोधित करणार आहेत. या वर्षातील ही शेवटची मन की बात असणार आहे. सरत्या वर्षावेळी पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. काल 12 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण, बुस्टर डोस (Booster dose) बाबत मोठी घोषणा केल्यानंतर आज मन की बात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोससंबंधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणा संबंधीदेखील माहिती दिली. 

दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 84वा भाग आहे. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करत असते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.

नोव्हेंबर 2021 च्या गेल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलिया आणि बुंदेलखंडच्या झाशीचं एक वेगळं नातं असल्याचं म्हटलं होतं.'सॅक्रेड इंडिया गॅलरी'चा उल्लेख करत त्यांनी भारत-ऑस्ट्रेलियाच्या संबंधांवर भाष्य केलं होतं. शिवाय पुण्याच्या मयूर पाटील या तरुण उद्योजकाशी देखील स्टार्टअपसंदर्भात त्यांनी संवाद साधला होता.   पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 84 वी मन की बात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी