Mannerless CM Kejriwal Video : राज्यातील कल्याणासाठी पंतप्रधान मोदी जोडत होते हात, अन् खुर्चीवर रेलत होते अरविंद केजरीवाल; भाजपला आला संताप

देशात वाढत असलेल्या कोरोना (corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान (Prime Minister ​) नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशातील सर्व मुख्यमंत्र्य़ांशी संवाद साधला. या दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) वाढत्या दरावरुनही पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली.

During the meeting with the PM, CM Kejriwal got bored
पीएमसोबतच्या बैठकीदरम्यान सीएम केजरीवाल यांना आला कंटाळा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी विनंती करत असताना दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं गैरवर्तन
  • भाजपने बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोविड19 आढावा बैठकीचा व्हिडिओ स्निपेट पोस्ट केला.

 Mannerless CM : नवी दिल्ली :  देशात वाढत असलेल्या कोरोना (corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान (Prime Minister ​) नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशातील सर्व मुख्यमंत्र्य़ांशी संवाद साधला. या दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) वाढत्या दरावरुनही पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली. ज्या राज्यांनी व्हॅट कमी केला नाही, त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी खडेबोल सुनावले. नागरिकांना वाढत्या दरातून दिलासा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदींनी विनंती केली, परंतु या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी विनंती करत असताना दिल्लीचे मु्ख्यमंत्री (Chief Minister) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचं गैरवर्तन दिसून आले. यावरुन भाजप आक्रमक झाले असून त्यांनी केजरीवालांच्या गैरवर्तनाचा व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.  

भारतीय जनता पक्षाने बुधवारी दुपारी एका ट्विटमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर 'निराचार' असल्याबद्दल निंदा केली. भाजपने बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोविड19 आढावा बैठकीचा व्हिडिओ स्निपेट पोस्ट केला. व्हिडिओमध्ये आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान हात पसरताना दिसत आहेत. 

पंतप्रधान मोदींची बैठक 

भारतभरात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. साथीच्या आजाराव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींनी बैठकीत वाढत्या इंधन दरांवरही चर्चा केली. सामान्य माणसाच्या फायद्यासाठी "राष्ट्रीय हितासाठी" मूल्यवर्धित कर कमी करण्याचे त्यांनी राज्यांना आवाहन केले.

"मी कोणावरही टीका करत नाही पण तुमच्या राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे... लोकांच्या हितासाठी मी तुम्हाला सहा महिन्यांच्या विलंबानंतरही व्हॅट कमी करण्याची विनंती करतो," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरीवाढीची समस्या सध्या सर्वाच्या चर्चेतील विषय आहे. इंधनाच्या किंमती वाढीमागे केंद्र सरकार जबाबदार असल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. तर भाजपने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या वाढत्या किमतीचा हवाला दिला आहे आणि प्रतिस्पर्धी पक्षांनी चालवलेल्या राज्यांवर हल्ला केला आहे.

Read Also : कान्स फिल्म फेस्टिवलच्या परीक्षकपदी दीपिकाची वर्णी 

पंतप्रधान मोदी राज्यातील लोकांच्या भल्यासाठी हात जोडून प्रार्थना करत होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूकडून व्हिडिओ कॉलवर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे खुर्चीवर रेलत होते. त्यावरुन पु्न्हा एकदा भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.  दरम्यान या बैठकीदरम्यान मोदींनी ज्या राज्यांनी व्हॅट कमी केला नाही त्यांची लिस्ट काढून त्यांना सर्वांसमोर सुनावलं आहे. यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी