डेटिंग अॅपच्या जाळ्यात अडकले १५० पेक्षा अधिक, कॉर्पोरेट जगतातील मोठे अधिकारीही शिकार 

डेटिंग अॅप ग्रिंडरबाबत गुरूग्राम पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या अॅपच्या माध्यमातून ५० पेक्षा अधिका कॉर्पोरेट जगतातील अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकरणं समोर आले आहेत. 

many executives trapped on gay dating app robed by a gang in gurugram crime news in marathi tcri 33
डेटिंग अॅपच्या जाळ्यात अडकले १५० पेक्षा अधिक, कॉर्पोरेट जगतातील मोठे अधिकारीही शिकार   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • डेटिंग अॅपद्वारे लोकांना भेटणे काही पुरूषांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागले आहे.
  • दिल्ली NCRमधील १५० लोकांनी गे डेटिंग अॅपद्वारे फसवून ब्लॅकमेल करण्यात आले
  • पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, अनेक मोठ्या कॉर्पोरेट जगतातील अधिकारी झाले शिकार 

गुरूग्राम :  डेटिंग अॅपचा वापर करून काहींना भेटणे अनेकांना अडचणीचे ठरले आहे. दिल्ली एनसीआरच्या सुमारे १५० पेक्षा अधिक लोकांना डेटिंग अॅप ग्रिंडरबाबत पोलिसांना मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनुसार ग्रिंडर अॅपद्वारे अनेक व्यक्तींना फसविण्यात आले. इतकेच नाही तर डेटवर बोलवून अश्लील फोटो क्लिक करण्यात आले आणि त्यांच्याद्वारे लोकांना ब्लॅकमेल करण्यात आले. विशेष म्हणजे पीडित लोकांमध्ये जास्त जास्त कॉर्पोरेट जगतातील आहे. यात ५० जण असे आहेत की ते कोणत्या ना कोणत्या कॉर्पोरेट कंपनीचे सीईओ आहेत, किंवा मोठ्या पदावर विराजमान आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार बादशाहपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर मुकेश यांच्या टीमने या प्रकरणी एका गँगच्या पाच जणांना अटक केली आहे. मुकेश यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून हे लोक काही जणांना आपले शिकार बनवत आहे. लाजेमुळे या गँगविरूद्ध पीडित लोक पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. हे लोक कॉर्पोरेट जगतातील मोठे अधिकाऱ्यांना फसवत होते. त्यामुळे त्यांना गंडवणे सोपे जात होते. 

या गँगचा म्होरक्या गुरूग्रामच्या भोंडसी येथील आहे. चौकशीत त्यांना सांगितले की चॅटिंगच्या आधारे ते लोकांना फसवत होते. डेटिंगसाठी त्यांना गुरूग्रामच्या वेस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे आणि साऊथ पेरिफेरल रोडवरील वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...