भारीच... ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्याच-सुट्ट्या, पाहा ऑक्टोबर २०१९ मधील सुट्ट्यांची यादी 

पुढील महिन्यात दसरा, दिवाळी हे मोठे सण असणार आहेत. अशावेळी अनेक कार्यालयांना बरीच सुट्टी मिळणार आहे. तसंच बँक हॉलिडे असल्याने बँकाही बंद राहतील. तर जाणून घ्या ऑक्टोबर २०१९ मधील बँक हॉलिडेची संपूर्ण यादी.

many holidays in month of october see the list of holidays in October 2019
भारीच... ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्याच-सुट्ट्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • जाणून घ्या ऑक्टोबर २०१९ मध्ये दसरा-दिवाळीसोबत बँक हॉलिडेची संपूर्ण यादी 
 • अनेक बँक हॉलिडे असल्याने बँकेंची कामं पटकन उरकून घ्या 
 • पुढील महिन्यात अनेक राज्यांमध्ये कार्यालयांना बरेचा दिवस मिळणार सुट्ट्या

मुंबई: सुट्ट्यांच्या दृष्टीने ऑक्टोबर २०१९ हा महिना खूपच खास असणार आहे. कारण की, या महिन्यात दसरा आणि दिवाळी असे दोन्ही मोठे सण असणार आहेत. या सणांनिमित्त अनेक जण गावी जाणं पसंत करतात. त्यामुळे सुट्टी नेमकी कधी असणार हे आधीच काही जण पाहून ठेवतात. त्यामुळे आता आम्ही आपल्यासाठी पुढील महिन्यातील सुट्ट्यांची यादीच घेऊन आलो आहे. अनेकांना ऑक्टोबर महिन्यात मोठी सुट्टी मिळते. याशिवाय दिवाळी देखील याच महिन्यात असल्याने खरेदी साठी पैशांचीही गरज भासणार आहे. त्यामुळे पुढील महिना हा पगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 

३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला पगार येणार असल्याने आपल्याला हा महिना कॅशच्या हिशोबाने मॅनेज करावा लागणार आहे. कारण, बरेच बँक हॉलिडे असल्याने चलनाचा काहीसा तुटवडा भासू शकतो. तर जाणून घ्या कोणत्या या महिन्यात नेमके किती आणि कोणत्या दिवशी असणार आहे सुट्टी. 

 1. २ ऑक्टोबर २०१९, बुधवार: या दिवशी गांधी जयंती असल्याने संपूर्ण देशातील बँकांना आणि कार्यालयांना सुट्टी असणार आहे. 
 2. ५ ऑक्टोबर २०१९, शनिवार: नवरात्रीमध्ये महासप्तमी ५ ऑक्टोबरला असणार आहे. त्यामुळे या दिवशी त्रिपुरा, सिक्किम, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये सुट्टी असणार आहे. 
 3. ७ ऑक्टोबर २०१९, सोमवार: या दिवशी महानवमी असणार आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबरला उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओडिशा, झारखंड या राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. 
 4. ८ ऑक्टोबर २०१९, मंगळवार: या दिवशी दसरा असल्याने संपूर्ण देशात सुट्टी असणार आहे. 
 5. १५ ऑक्टोबर २०१९, मंगळवार: या दिवशी श्री गुरू राम दास जी का प्रकाश गुरूपूरब आहे. यामुळे पंजाबमध्ये बँक हॉलिडे असणार आहे. 
 6. २६ ऑक्टोबर २०१९, शनिवार: २६ ऑक्टोबर हा महिन्यातील चौथा शनिवार आहे. त्यामुळे या दिवशी बँका बंद असतील.
 7. २८ ऑक्टोबर २०१९, सोमवार: या दिवशी दिवाळी पाडव्याची सुट्टी असणार आहे. ही सुट्टी महाराष्ट्र, उत्तराखंड, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब या दिवशी असणार आहे. या दिवशी शेअर मार्केट देखील बंद असेल. 
 8. २९ ऑक्टोबर, २०१९, मंगळवार: या दिवशी भाऊबीज असल्याने उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि सिक्किममध्ये बँक हॉलिडे असणार आहे. 
 9. ३१ ऑक्टोबर २०१९, गुरुवार: या दिवशी सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरला गुजरातमध्ये बँक हॉलिडे असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी