उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएचा उमेदवार ठरवण्यात आला आहे. 

margaret alva will be UPA candidate for vice president of india election announced by Sharad Pawar press conference in delhi
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
 • शरद पवारांच्या घरी विरोधकांची तासभर खलबतं 
 • उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरला
 • राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत मार्गारेट अल्वा यांच्या नावावर झाला शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Vice President Election) यूपीएच्या उमेदवारावर चर्चा झाली. जवळपास तासभर झालेल्या या बैठकीनंतर विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) या असतील अशी घोषणा केली आहे. (UPA announces Margaret Alva as Vice Presidential Candidate)

एनडीएने जगदीप धनकड यांचं नाव उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केलं. त्यानंतर यूपीएचा उमेदवार कोण असणार याची सर्वांना उत्सुकता होती. त्याच संदर्भात आज शरद पवारांच्या निवासस्थानी देशभरातील १६ ते १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. 

कोण आहेत मार्गारेट अल्वा? 

 1. मार्गारेट अल्वा या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्या आहेत. मात्र, सध्या त्यांचा काँग्रेससोबत संबंध नाही.
 2. मार्गारेट अल्वा यांचा जन्म १४ एप्रिल १९४२ मध्ये कर्नाटकात झाला.
 3. त्यांचे शिक्षण कर्नाटकातच पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला 
 4. काँग्रेस पक्षाकडून मार्गारेट अल्वा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले
 5. विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. 
 6. काँग्रेस पक्षाकडून १९७५ मध्ये त्यांना पक्षाच्या सरचिटणीसपदावर नियुक्ती केली
 7. उत्तराखंड, राजस्थान, गुजरात आणि गोव्याच्या राज्यपाल राहिल्या आहेत
 8. अल्वा या एकूण चार वेळा राज्यसभेच्या सदस्या होत्या 
 9. त्यानंतर १९९९ मध्ये त्या लोकसभेची निवडणूक लढल्या आणि विजयी झाल्या

विरोधकांची मते फुटणार?

एनडीए उमेदवारांचा विजय खूपच सुकर आहे असं दिसत आहे. या निवडणुकीत विरोधकांमध्ये फुट पडणार का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण, आज विरोधकांच्या पार पडलेल्या बैठकीत आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधींची उपस्थिती नव्हती. त्यामुळे या दोन पक्षांची भूमिका काय आहे हे पहावं लागेल.

तर शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला आहे तर त्याच शिवसेनेचे नेते संजय राऊत आज शरद पवारांच्या घरी बैठकीसाठी उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला पाठिंबा यूपीए उमेदवाराला जाहीर केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी