गुजरातमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; रिअ‍ॅक्टरजवळ काम करणारे 6 कामगार जिवंत जळाले

गुजरातमधील (Gujarat) भरुच जिल्ह्यात एका केमिकल कारखान्यात  (chemical factory) सोमवारी भीषण आग लागली. ज्यामध्ये 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर एक मजूर बेपत्ता झाला आहे. अहमदाबादपासून (Ahmedabad) सुमारे 235 किमी अंतरावर असलेल्या दहेज औद्योगिक परिसरात (Industrial Area) पहाटे 3 वाजता ही घटना घडली आहे.

Massive blast at a chemical company in Gujarat
भरूचच्या दहेज इंडस्ट्रियल परिसरातील केमिकल फॅक्टरीत स्फोट  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • याआधीही अनेकदा केमिकल कंपन्यामध्ये स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
  • दहेज औद्योगिक परिसरात पहाटे 3 वाजता ही घटना घडली.
  • दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार रिअॅक्टरच्या जवळ काम करत होते.

गांधीनगर : गुजरातमधील (Gujarat) भरुच जिल्ह्यात एका केमिकल कारखान्यात  (chemical factory) सोमवारी भीषण आग लागली. ज्यामध्ये 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर एक मजूर बेपत्ता झाला आहे. अहमदाबादपासून (Ahmedabad) सुमारे 235 किमी अंतरावर असलेल्या दहेज औद्योगिक परिसरात (Industrial Area) पहाटे 3 वाजता ही घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या बेपत्ता कामगाराचा शोध सुरू आहे.  भरुचच्या एसपी लीना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार एका रिअ‍ॅक्टरजवळ काम करत असताना अचानक स्फोट झाला. यामुळे सर्वांचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भरूच येथे रविवारी रात्री उशिरा ओम ऑर्गेनिक या केमिकल कंपनीत अचानक स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्फोटात 6 कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले. काही वेळानंतर भरूच येथील पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार रिअॅक्टरच्या जवळ काम करत होते, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

डिस्टिलेशनदरम्यान झाली दुर्घटना

आग लागली त्यावेळी ओम ऑरगॅनिक कंपनीत गाळ काढण्याचे काम सुरू होते. आग इतकी भीषण होती की, धुराचे लोट दूरवर दिसत होते. अपघातानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. आग इतकी भीषण होती की कंपनीतील सर्व वस्तू जळून खाक झाले आहे. पोलिसांसोबतच आरोग्य विभागही या घटनेचा तपास करत आहे. कंपनीतील अग्निसुरक्षा उपकरणे कंपनीत होती की नाही, याचीही तपासणी पोलीस करत आहेत.

भरूचमध्ये दुर्घटनांचं सत्र

भरूचमध्ये याआधीही अनेकदा केमिकल कंपन्यामध्ये स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जीआईडीसीतील एका केमिकल कंपनीत स्फोट होऊन २३ फेब्रुवारी २०२१ रोजी २४ जण जखमी झाले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्येही झालेल्या एका दुर्घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा एकदा केमिकल कंपनीत स्फोट झाल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला  आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी