मथुरा: Banke Bihari Mandir Stampede: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त (Shri Krishna Janmashtami) जगप्रसिद्ध बांकेबिहारी मंदिरात होणाऱ्या मंगला आरतीदरम्यान (Mangala Aarti) भीषण अपघात (terrible accident) झाला. गर्दीमुळे काही भाविकांचा श्वास गुदमरला. ज्यात 2 भाविकांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. जखमींना वृंदावनातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बांकेबिहारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने सर्व व्यवस्था केली होती. जी अपुरी ठरली आणि चेंगराचेंगरीत दोन भाविकांचा चिरडून मृत्यू झाला.
अधिक वाचा- पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टची सवलत योजना
कशी घडली घटना ?
बांके बिहारी मंदिरात वर्षातून एकदा होणाऱ्या मंगला आरतीदरम्यान गुदमरून दोन भाविकांचा मृत्यू झाला. कारण मंदिराच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पट जास्त भाविकांची गर्दी झाली होती. गर्दीमुळे काही भाविकांना गुदमरल्यासारखे झाले आणि अनेक भाविक जखमी झाले. या अपघातात नोएडा सेक्टर 99 येथील निर्मला देवा आणि भुलेराम कॉलनी रुक्मणी बिहार वृंदावन येथील 65 वर्षीय राम प्रसाद विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला. राम प्रसाद हे मूळचे जबलपूरचे होते.
#BreakingNow: मथुरा स्थित वृंदावन के बांके बिहारी मंदिर में हादसा, भगदड़ के कारण 2 श्रद्धालुओं की मौत@PreetiNegi_ @AnchorAnurag #Vrindavan #UttarPradesh #Mathura pic.twitter.com/3T68lKBNsa — Times Now Navbharat (@TNNavbharat) August 20, 2022
भाविकांवर उपचार शहरातल्या रूग्णालयात उपचार
मंदिरात अपघात झाला त्यावेळी डीएम, एसएसपी, महापालिका आयुक्तांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अपघात होताच पोलीस आणि खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध पडलेल्या भाविकांना मंदिरातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. या अपघातात जखमी झालेल्या भाविकांना रामा कृष्णा मिशन, ब्रज हेल्थ केअर आणि वृंदावन येथील सौ शैया रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोन भाविकांना मृत घोषित केले.
भाविकांची प्रचंड गर्दी
कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं शेकडो परदेशी लोकांसह मोठ्या संख्येनं कृष्ण भक्तांनी मथुरेच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये पूजा केली आणि श्री कृष्णाच्या जन्मोत्सवात मोठ्या थाटामाटात भाग घेतला. उत्सवात हजारो भाविकांनी श्रीकृष्ण जन्मस्थानच्या विस्तीर्ण प्रांगणात पहाटेपासूनच शहनाई आणि ढोलाच्या तालावर नाचत आनंद व्यक्त करत जन्माष्टमीला सुरुवात केली. मथुरेतील प्रमुख चौक या प्रसंगी खास सजवण्यात आले होतं.