Priority for vaccination : बूस्टर डोसपेक्षा लसीकरण आणि कोविड प्रोटोकॉल पाळण्याला महत्त्व द्या - WHO chief

Maximum deaths in unvaccinated people not un-boosted people says WHO chief : कोरोना संकटाला थोपविण्यासाठी जगातील प्रत्येक नागरिकाने आवश्यक असलेले कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचून घेणे आणि कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. बूस्टर डोस हा कोरोनाला प्रतिबंध करण्याचा उपाय नाही.

Maximum deaths in unvaccinated people not un-boosted people says WHO chief
बूस्टर डोसपेक्षा लसीकरण आणि कोविड प्रोटोकॉल पाळण्याला महत्त्व द्या - WHO chief 
थोडं पण कामाचं
  • बूस्टर डोसपेक्षा लसीकरण आणि कोविड प्रोटोकॉल पाळण्याला महत्त्व द्या
  • जगातील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण लवकर करणे हा कोरोनाला थोपविण्याचा मार्ग
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती

Maximum deaths in unvaccinated people not un-boosted people says WHO chief : जीनीव्हा (Geneva) : कोरोना संकटाला थोपविण्यासाठी जगातील प्रत्येक नागरिकाने आवश्यक असलेले कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचून घेणे आणि कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. बूस्टर डोस हा कोरोनाला प्रतिबंध करण्याचा उपाय नाही; असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (World Health Organization / WHO) टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus, Director-General of the World Health Organization) म्हणाले.

Winter Diet: थंडीत खा या २ गोष्टी, इम्युनिटी सिस्टीम होईल मजबूत

ज्या देशांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे त्याच देशांमध्ये बूस्टर डोस मोहीम सुरू करुन कोरोनाला थोपविता येणार नाही. बूस्टर डोस पेक्षा ज्या देशांमध्ये अद्याप पुरेसे लसीकरण झाले नाही त्या देशांना कोरोना प्रतिबंधक लसचे डोस पुरविणे आवश्यक आहे. जगातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाल्यानंतर कोरोना संकटाला थोपविणे शक्य होणार आहे. यामुळे बूस्टर डोस पेक्षा लसीकरणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे; असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले.

निवडक देशांमध्ये लसीकरण तसेच बूस्टर डोसची मोहीम राबविली आणि काही देशांना लस मिळालीच नाही तर कोरोना संकट संपणार नाही. उलट कोरोना विषाणूला संसर्ग पसरविण्याची आणि विषाणूला स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी मिळत राहील. यामुळे बूस्टर डोस ऐवजी लसीकरण मोहिमेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी कोवॅक्स (COVAX) मोहिमेंतर्गत ज्या देशांना अद्याप पुरेश्या प्रमाणात लस मिळालेली नाही त्या देशांना लस पुरविणे आवश्यक आहे. 

जर ३० जून २०२२ पर्यंत जगातील ७० टक्के लोकसंख्येचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले असेल तर कोरोना संकटाला थोपविणे शक्य होईल. यासाठी प्रत्येक देशाने लसीकरण मोहीम राबवणे आणि आपल्या देशातील लसीकरण व्यवस्थित सुरू असल्यास गरजवंतांना लस पुरवठा करणे आवश्यक आहे.

निवडक देशांमध्ये लसीकरणानंतर बूस्टर डोसची मोहीम राबविली आणि काही देशांमध्ये लसीकरणच झाले नसेल तर कोरोना संकट संपणार नाही. उलट नवनव्या अवतारात कोरोनाचा विषाणू सक्रीय होत राहील; असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी