दोन सख्या बहिणींसोबत शेजाऱ्याकडून गँगरेप, आरोपीने मुलींचे आक्षेपार्ह फोटोही केले व्हायरल

Two Sisters Gang-Raped in Rajasthan: दोन अल्पवयीन बहिणींवर दोन वर्षांपासून सामूहिक बलात्कार करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये समोर आली आहे.

meighbors gang rape with sister this sensational incident has happened in rajasthan
दोन सख्या बहिणींसोबत शेजाऱ्याकडून गँगरेप, आरोपीने मुलींचे आक्षेपार्ह फोटोही केले व्हायरल  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • सलग दोन वर्षांपासून शेजारी करत होत दोन बहिणींवर बलात्कार 
  • पीडित मुली अल्पवयीन असल्याचं आलं समोर
  • आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरु 

बाडमेर (राजस्थान): राजस्थानच्या बाडमेर शहरात दोन सख्ख्या बहिणींसोबत सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोन बहिणींवर त्यांचा शेजाऱ्यानेच वारंवार बलात्कार करत होता. दोन्ही बहिणी या अल्पवयीन असून त्यांच्यातील एकीचे वय १७ आणि दुसरीचं वय १५ वर्ष आहे. दरम्यान हे प्रकरण उघडकीस येताच आरोपींनी पळ काढला आहे. तनवीर माळी आणि नरेश दिशांतारी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीने शेजारी असल्याचा फायदा घेत एका महिलेच्या मदतीने दोन बहिणींवर वारंवार अत्याचार केले. आरोपींनी पीडितांचे अश्लील फोटोही काढून ते सोशल मीडियावर शेअर देखील केले होते.

दोन्ही बहिणांना शाळेत जाताना आरोपी द्यायचे त्रास 

मीडिया रिपोर्टनुसार, हे संपूर्ण प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा पीडित मुलींचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोन्ही बहिणी शाळेत जात असताना आरोपी त्यांची छेड काढायचे. हा संपूर्ण प्रकार अनेक दिवस सुरु होता. या कारणास्तव कुटुंबातील सदस्यांनी दोन्ही बहिणींचं शाळेत जाणं देखील बंद केलं होतं. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या वैद्यकीय चाचणी करुन त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. 

या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक पुष्पेंद्र आढा म्हणाले की, 'या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी पीडित मुलींची वैद्यकीय चाचणी केली असून तपास देखील सुरू केला आहे. त्याचवेळी आरोपींना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. 

पीडितेच्या अपहरणाचा प्रयत्न 

काही दिवसांपूर्वी आरोपी नरेश हा एका पीडित मुलीचे अपहरण करुन तिला गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, वेळेत माहिती मिळाल्याने मुलीची सुटका करण्यात आली. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार पीडितेला आरोपीच्या तावडीतून सोडवून घरी परत आणण्यात आलं. पण आपली समाजात कुठेही बदनामी होऊ नये यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, आरोपींनी जेव्हा मुलींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात पोलिसात तक्रार केली. यावेळी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी