उल्कापिंड की चीनी सॅटेलाईट? महाराष्ट्र अन् मध्यप्रदेशातील आकाशात दिसलेला रहस्यमयी आगीचा गोळा आहे तरी काय?

भारताच्या अनेक भागात शनिवारी रात्री आकाशात आगीचा गोळा दिसल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेशातील (Madhya pradesh)अनेक भागातील आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना दिसला.

What is the mysterious fireball seen in the sky in Maharashtra
महाराष्ट्रातील आकाशात दिसलेला रहस्यमयी आगीचा आहे तरी काय?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अमेरिकन शास्त्रज्ञांच्या मते हे चिनी उपग्रह असेल.
  • महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यात हा आगीचा गोळा दिसला.

नवी दिल्ली : भारताच्या अनेक भागात शनिवारी रात्री आकाशात आगीचा गोळा दिसल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेशातील (Madhya pradesh)अनेक भागातील आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा पडताना दिसला. हा   उल्कापिंड (Meteor shower)आहे की पडणारा उपग्रह आहे की आणखी काही याविषयी लोकांच्या मनात संभ्रम तयार झाला आहे. दरम्यान लोकांनी हे दिव्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर (Social media) शेअर केले आहे. काही वेळातच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे नेमकं काय आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ लागाला. 

रात्रीच्यावेळी आकाशातून जमिनीच्या दिशेने खाली पडणारे आगीचे गोळे नेमके काय आहेत याबद्दल खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. हे उल्का नसून उपग्रहाचे तुकडे असू शकतात, जे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना जळत होते, असं खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलं.  तर एका अमेरिकन शास्त्रज्ञानं दावा केला आहे की, हे चिनी रॉकेटचे (chinese rocket) भाग आहेत. आकाशातील हे अद्भूत दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांत पाहायला मिळालं. त्याचवेळी मध्य प्रदेशातील इंदूर, खरगोन, झाबुआ आणि बरवानी जिल्ह्यातील अनेक लोकांनी हे दृश्य पाहिल्याचा दावा केला आहे. जोनाथन मॅकडॉवल (Jonathan McDowell) या अमेरिकन शास्त्रज्ञानं ट्विटमध्ये म्हटलं की,  मला वाटतं की हे चीनचे रॉकेट चेंग झेंग 3बी होते, जे पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करत होतं. हे रॉकेट गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रक्षेपित करण्यात आलं होतं. पृथ्वीच्या दिशेने परत येत असताना, वातावरणाच्या संपर्कात आल्यानं त्याचे भाग जळत होते.

मॅसेच्युसेट्समधील केंब्रिज येथील हार्वर्ड-स्मिथसन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्सचे शास्त्रज्ञ मॅकडोव्हल यांनी सांगितलं की, चीनचे रॉकेट चेंग झेंग 3B सीरियल नंबर Y77 या मार्गावरून पडणार होते. मला वाटतं आकाशात दिसणाऱ्या तेजस्वी रेषा त्याच्या जळण्यामुळे निर्माण झाल्या होत्या. नागपुरातील स्कायवॉच ग्रुपचे चेअरमन सुरेश चोपडे यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना असाच अंदाज व्यक्त केला. ते म्हणाले की, या तेजस्वी रेषा उल्का पावसाशी संबंधित असण्याची शक्यता खूपच कमी आहे. यातून रंगीबेरंगी दिवे बाहेर पडत होते, जे उल्कापिंडांचे असू शकत नव्हते. जेव्हा त्या वस्तूमध्ये धातूची वस्तू असते तेव्हाच हे रंग दिसतात. मला वाटतं एकतर कुठल्यातरी देशाचा उपग्रह चुकून पडला, असावा किंवा काम पूर्ण झाल्यावर ते जाणूनबुजून क्रॅश केलं असावं.

जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं की, औरंगाबाद येथील एपीजे अब्दुल कलाम अॅस्ट्रोस्पेस अँड सायन्स सेंटरच्या शास्त्रज्ञांच्या मते, या पडणाऱ्या वस्तू रॉकेट बूस्टर असू शकतात, ज्यातून उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जातात. अशा घटना सतत घडत असतात. तर केंद्राचे संचालक श्रीनिवास औंढाकर यांनी सांगितले की, शनिवारी जगभरातून एकच उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार होता. अमेरिकन कंपनी ब्लॅकस्कायने संध्याकाळी 6.11 वाजता एक उपग्रह अवकाशात पाठवला होता. कदाचित या पडणाऱ्या वस्तू त्याचे रॉकेट बूस्टर असतील, ज्याचा उपयोग उपग्रहाला आकाशात नेण्यासाठी केला जातो.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी