Weather Update : उत्तर भारतीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात थंडीने मोठा कहर होता. हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. पुढचे पाच दिवस उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र यादरम्यान अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Meteorological department announced five days forecast, cold wave will goaway )
अधिक वाचा : शनिश्चरी अमावस्या म्हणजे काय, कधी आहे ही अमावस्या?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 21 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, 22 जानेवारीनंतर येथील हवामानात बदल होईल. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 23 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
अधिक वाचा : शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार
येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे लोकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळणार आहे. उत्तर प्रदेशात येत्या पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, तर किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होणार आहे. मात्र, येत्या 24 तासात त्यात कोणताही बदल दिसणार नाही. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे 23 ते 26 जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.