अंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 ठार

Mexican mayor among 18 dead in mass shooting : अंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिको येथे घडली आहे.

Mexican mayor among 18 dead in mass shooting
बेधुंद गोळीबारात महापौरांसह 18 ठार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 ठार
  • गोळीबार केल्यानंतर मारेकरी फरार
  • पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत

Mexican mayor among 18 dead in mass shooting : अंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिको येथे घडली आहे. मेक्सिको देशातील गुरेरो राज्यातील सॅन मिगुएल टोटोलापनच्या सिटी हॉलमध्ये एका शस्त्रधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर मारेकरी फरार झाला. पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. 

Mumbai Crime News : दसर्‍याच्या दिवशी मुंबईत घडली धक्कादायक घटना, विशीतल्या तरुणीसोबत...

मारेकऱ्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची आणि वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. पण अद्याप मारेकऱ्याला पकडण्यात पोलीस यशस्वी झालेले नाही. 

Bigg Boss Marathi Season 4: घरामध्ये प्रसादला सारखं केलं जातंय टार्गेट?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार 5 जुलै 2022 रोजी दुपारी शस्त्रधारी व्यक्ती सिटी हॉलमध्ये दाखल झाली. या व्यक्तीने  गोळीबार केला. गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये महापौर कोनराडो मेंडोझा, त्यांचे वडील आणि माजी महापौर जुआन मेंडोझा तसेच सात पोलिसांचा समावेश आहे.

गोळीबाराच्या घटनेचे काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. फोटोंमध्ये सिटी हॉलच्या भिंतींवरील गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. हॉलच्या खिडक्यांच्या काचा पण तुटल्या आहेत. 

अमेरिकेत  गोळीबाराच्या घटना घडत असतात. आता मेक्सिकोतही गोळीबाराची घडली आहे. पण ही घटना घडण्यामागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करून चौकशी केल्यानंतरच सत्य कळेल. मेक्सिकोतील गोळीबाराचा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करांमधील टोळीयुद्धाशी आहे का, या शक्यतेचाही पोलीस तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी