Mi-17V5 Helicopter Crash : सर्वाधिक आधुनिक Helicopter तमिळनाडूत कोसळलं; सीडीएस रावत गंभीर जखमी, हेलिकॉप्टर Crash होण्याचं काय असू शकते कारण?

Army Mi-17V5  Helicopter Crash: तामिळनाडू (Tamil Nadu) च्या निलगिरी (Nilgiri District) जिल्ह्यातील कुन्नूर (Coonoor) मध्ये वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे लष्करा (Army) चे Mi-17V5 Helicopter हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टर (Helicopter) मध्ये सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) ही आपल्या पत्नीसह प्रवास करत होते.

Mi-17V5 Helicopter Crash
Mi-17V5 हेलिकॉप्टर Crash होण्याचं काय असू शकते कारण?  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि त्यांचे कुटुंबीयही हेलिकॉप्टरमध्ये होते.
  • भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले
  • या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. कोर्ट ऑफ इन्क्वायरी केली जाईल, त्यानंतरच अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे कळेल.

Army Mi-17V5  Helicopter Crash:  कुन्‍नूर : तामिळनाडू (Tamil Nadu) च्या निलगिरी (Nilgiri District) जिल्ह्यातील कुन्नूर (Coonoor) मध्ये वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे लष्करा (Army) चे Mi-17V5 Helicopter हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टर (Helicopter) मध्ये सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) ही आपल्या पत्नीसह प्रवास करत होते. दरम्यान या दुर्घघटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक (Rescue squad) घटनास्थळी पोहोचले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सीडीएस बिपीन रावत आणि इतर दोन अधिकारी हे गंभीर जखमी झाले आहेत. 

सीडीएस बिपीन रावत हे उत्तराखंड येथील आहेत. लष्कर प्रमुखाच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना सीडीएस बनवण्यात आले होते. ते तिन्ही लष्कर दलाचे प्रमुख होते, ते भारताचे प्रथम सीडीएसही होते. सीडीएस रावत ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते, ते हेलिकॉप्टर जगातील सर्वात जास्त आधुनिक हेलिकॉप्टर आहे, त्यामुळे कोसळण्यामागे काय कारण आहे, याविषयी वेगळाच संशय रंगू लागला आहे.  या हेलिकॉप्टरचा अपघातही आश्‍चर्यचकित करणारा आहे कारण यात दोन इंजिने आहेत, ज्यामुळे एका इंजिनमध्ये बिघाड झाला तरी ते दुसऱ्या इंजिनसह सुरक्षितपणे उतरू शकते. ते सियाचीनसारख्या ठिकाणीही कठीण परिस्थितीत उड्डाण करण्यास सक्षम आहे. जगातील सर्वात आधुनिक  लष्करी हेलिकॉप्टरमध्ये या हेलिकॉप्टरचा समावेश होतो. 

MI-17 हेलिकॉप्टर खास का आहे?

  • Mi-17 V5 ची निर्मिती रशियन कंपनी कझान हेलिकॉप्टरने केली आहे. हे दुहेरी इंजिन असलेले बहुउद्देशीय हेलिकॉप्टर असून ते MI-8 ची अपग्रेडेड आवृत्ती आहे. हे एक मध्यम लिफ्ट हेलिकॉप्टर आहे. 
  • यात 3 क्रूसह 36 सैनिक असू शकतात. जगातील सुमारे 60 देशांमध्ये 12 हजारांहून अधिक MI-17 हेलिकॉप्टर आहेत. हे उच्च उंचीवर आणि गरम हवामानातही काम करण्यास सक्षम राहील अशाप्रकारे हे डिझाइन करण्यात आले आहे.
  • Mi-17V-5 ची गणना जगातील सर्वात प्रगत वाहतूक हेलिकॉप्टरमध्ये केली जाते. त्यामुळे याचा उपयोग बचाव मोहीम, वाहतूक, हेवीलिफ्ट आणि व्हीव्हीआयपी हालचालींमध्ये केला जातो. 
  • ते 36 हजार किलोपर्यंत वजन उचलू शकते. Mi-17V-5, जे VVI साठी सुधारित केले आहे. 

Mi-17V-5 भारतात कधी आले?

संरक्षण मंत्रालयाने 80 Mi-17V-5s च्या ऑर्डरसाठी रशियासोबत $1.3 बिलियन करारावर स्वाक्षरी केली. 2011 पासून त्यांची डिलिव्हरी सुरू झाली. 2013 पर्यंत एमआय सीरीजची 36 हेलिकॉप्टर मिळाली होती. जुलै 2018 मध्ये भारताला Mi-17V-5 ची शेवटची खेप मिळाली होती. आज बुधवारी अपघात झालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या बॉक्समधून घटनेविषयी इतर गोष्टी समोर येऊ शकतील. यामुळे इतकं आधुनिक असलेलं हेलिकॉप्टर कोसळू कसे शकते असा प्रश्न उपस्थित होतं आहे. दरम्यान सोमवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारत भेटीला आले होते. त्यावेळी भारत आणि रशियामध्ये शस्त्रांचा करार झाला. रशिया भारताला एके-203 रायफल एके-203 असॉल्ट रायफल देणार आहेत. अशात रशियन कंपनी निर्मित हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानं वाद होण्याची शक्यता आहे. 

MI-17 हेलिकॉप्टर  कोसळण्याचे कारण काय असू शकते 

आतापर्यंतच्या वृत्तानुसार हा अपघात खराब हवामानामुळे झाला आहे. अपघात झाला तो भाग दाट आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होऊन दिल्लीला परतत होते, त्याच दरम्यान हवाई दलाचे Mi17-V5 हेलिकॉप्टर निलगिरीच्या जंगलात कोसळले. असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वेलिंग्टन येथे सशस्त्र दलांचे महाविद्यालय आहे. येथे सीडीएस रावत व्याख्यान देणार होते, मात्र कुन्नूरच्या घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. बचावकार्य सुरू आहे. या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. कोर्ट ऑफ इन्क्वायरी केली जाईल, त्यानंतरच अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे कळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी