मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स होणार वेगळे; २७ वर्ष टिकला संसार

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक (Microsoft founder) बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांची पत्नी मिलिंडा (Milinda Gates) यांनी २७ वर्षांच्या वैवाहीक आयुष्यानंतर घटस्फोट (divorce) घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Microsoft founders Bill Gates and Milinda Gates will getting divorce
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सचा २७ वर्षात मोडला संसार  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • २७ वर्षानंतर बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा होणार वेगळे
  • मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत
  • १९९४ मध्ये झाला होता बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा विवाह

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक (Microsoft founder) बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांची पत्नी मिलिंडा (Milinda Gates) यांनी २७ वर्षांच्या वैवाहीक आयुष्यानंतर घटस्फोट (divorce) घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयुष्यातील सर्वात मोठा निर्णयाची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला दिली आहे.याबाबत सांगताना गेट्स यांनी सांगितले की, आता आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात आम्ही एकमेकांसोबत राहु शकत नाहीत. परंतु, लोकांच्या भल्यासाठी आमच्या फाउंडेशनमध्ये एकत्र काम करत राहू.(Microsoft founders Bill Gates and Milinda Gates will getting divorce)

बिल आणि मिलिंडा गेट्स यांनी सोशल मीडियावर जारी जॉइंट स्टेटमेंटमध्ये म्हटले की, खुप विचार करुन आम्ही आमचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षात आम्ही तीन मुलांचे पालन पोषण केले. आम्ही लोकांच्या भल्यासाठी एक फाउंडेशनही स्थापन केले. आम्ही पुढेही या अंतर्गत काम करत राहू. पण, पती-पत्नी म्हणून पुढील आयुष्यात सोबत राहू शकणार नाहीत. आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत.

१९९४ मध्ये झालं होतं लग्न 

बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा विवाह १९९४ मध्ये झाला होता. त्यांची पहिली भेट ही १९८७ मध्ये झाली होती. बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा संसार हा २७ वर्ष चालला. बिल गेट्स यांच्या संसार मोडल्याची घटना अनेकांच्या भुवया उंचवणारी आहे. लोकांना प्रश्न पडला आहे, जगात ख्याती असलेल्या दाम्पत्यामध्ये काय झाले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी