Kargil War मध्ये मिग 27ला मिळालं 'बहादुर' नाव; पराक्रम पाहून पाक सैन्याची हालात व्हायची पतली, विमानाला म्हणायचे 'चुडैल'

देश आज कारगिल विजय (Kargil victory) दिवस साजरा करत आहे. 22 वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने (India) पाकिस्तानी (Pakistan)सैन्याचा (army) पराभव केला होता.1999 मध्ये पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी (terrorist) आणि सैनिक (soldier) कारगिलच्या टेकड्यांमध्ये घुसले होते. घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैनिकांनी ऑपरेशन विजय सुरू केले आणि प्रत्येक घुसखोराला ठार केले किंवा त्यांना पळून जाण्यास भाग पाडले.

Pakistan Army was called 'Chudail' to aircraft
Kargil War मध्ये मिग 27ला पाक सैन्य म्हणायचं 'चुडैल'   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • या कारगिल युद्धात विजय मिळवण्यासाठी भारताच्या लष्करासोबतच हवाई दलानेही अभूतपूर्व योगदान दिले.
  • ताशी १७०० किमीचा वेग आणि हवेतून जमिनीवर अचूक मारक क्षमता
  • मिग-२७ हे त्या काळातील सर्वोत्तम लढाऊ विमान होते.

नवी दिल्ली :  देश आज कारगिल विजय (Kargil victory) दिवस साजरा करत आहे. 22 वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने (India) पाकिस्तानी (Pakistan)सैन्याचा (army) पराभव केला होता.1999 मध्ये पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी (terrorist) आणि सैनिक (soldier) कारगिलच्या टेकड्यांमध्ये घुसले होते. घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैनिकांनी ऑपरेशन विजय सुरू केले आणि प्रत्येक घुसखोराला ठार केले किंवा त्यांना पळून जाण्यास भाग पाडले. या कारगिल युद्धात विजय मिळवण्यासाठी भारताच्या लष्करासोबतच (Army) हवाई दलानेही (air force) अभूतपूर्व योगदान दिले होते. हवाई दलाच्या लढाऊ विमानाने पाकिस्तानला एवढी मोठी घाव घातली की पाकिस्तान त्याला 'डायन' (चुडैल) म्हणत असे. आता यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाच्या या 'बहादुर'ला पाकिस्तान किती घाबरला असेल.

आता तुम्ही म्हणाल कोण होता हा बहादुर, त्याला पाक सैन्य का चुडैल म्हणायचं असे प्रश्न तुम्हाला आले असतील. तुमच्या या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत. दरम्यान भारत-पाकच्या युद्धाच्या वेळी कारगिल या उंच शिखरांवर घात घालून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना आकाशातून हल्ला होऊ, शकतो याची कल्पनाही नव्हती. तेव्हा भारतीय हवाई दलाच्या मिग 27 लढाऊ विमानांनी आकाशातून पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार सुरू केला. हवाई दलाच्या या बॉम्ब हल्लामुळे पाक लष्कराच्या पुरवठ्यावर आणि पोस्टवर इतका अचूक हल्ला केला गेला की पाक सैन्याची टाय-टाय फिस झाली होती. 

Read Also: भारतात किरकोळ महागाईची ट्रेन सुसाट; भारत 12 देशात अव्वल

ताशी १७०० किमीचा वेग आणि हवेतून जमिनीवर अचूक मारक क्षमता असलेल्या या रशियन लढाऊ विमानाला कारगिल युद्धात शौर्य दाखविल्याबद्दल बहादूर हे नाव देण्यात आले. याची भीती पाकिस्तानच्या मनात इतकी घट्ट बसली की त्याला 'डायन' हे नाव पडले.
जेव्हा हे विमान जमिनीच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ जात होते, तेव्हा कोणत्याही रडारला ते शोधणे कठीण होते. त्याच्या आवाजाने शत्रूंच्या मनात भीती निर्माण केली होती. मात्र, भारतीय हवाई दलातील 38 वर्षांच्या प्रवासात या लढाऊ विमानाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. 

हवेतून जमिनीवर अचूक लक्ष्य ठेवण्यात पटाईत 

मिग-२७ हे त्या काळातील सर्वोत्तम लढाऊ विमान होते. हवेतून जमिनीवर मारा करण्यात तो इतका पटाईत होता की शत्रूला काही कळण्याआधीच शत्रूचा नाश करत होता. हे लढाऊ विमान ताशी १७०० किलोमीटर वेगाने उड्डाण करण्यास सक्षम होते. याशिवाय ते चार हजार किलोग्रॅम वजनाचे वारहेड वाहून नेऊ शकते.

Read Also : पोलीस भरतीत मैदानात उशीरा आल्याने तरुणीचा विनयभंग

1981 मध्ये भारतीय हवाई दलाला पाकिस्तान आणि चीनशी सामना करण्यासाठी विशेष प्रकारच्या वेगवान लढाऊ विमानांची गरज होती. त्यावेळी अमेरिका, ब्रिटनसारखे पाश्चिमात्य देश पाकिस्तानच्या जवळ होते आणि ते त्यांची प्रगत लढाऊ विमाने भारताला देणार नव्हते. त्यावेळी रशियाने आपली मिग-२७ विमाने भारताला विकण्याची ऑफर दिली होती. 

Read Also : बेयर ग्रिल्स मांसाहारी जेवणावर मारतो ताव, असा आहे डाएट

रशियाने तर भारताला हे विमान बनवण्याचा परवाना देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर 1985 मध्ये हे विमान भारतीय हवाई दलात औपचारिकपणे सामील झाले. रशियाकडून परवाना मिळाल्यानंतर हिंदुस्थान एरोटोनिक्स लिमिटेडने मिग 27 विमानांच्या 165 युनिट्सची निर्मिती केली. याशिवाय HAL ने 86 विमाने देखील अपग्रेड केली आहेत. 

सोहळ्यानंतर हवाई दलातून मिग-27 लढाऊ विमान हटवण्यात आले

जोधपूर एअरफोर्स स्टेशनवर आयोजित समारंभानंतर भारतीय हवाई दलाने 2019 मध्ये मिग-27 विमान हटवण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी एअर मार्शल एस के घोटिया, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, साउथ वेस्टर्न एअर कमांड होते.  एअर मार्शल घोटिया म्हणाले की, हे विमान नेहमीच आघाडीवर होते आणि 1999 च्या कारगिल युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी