क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर आले आणि तरुणीवर केला गँगरेप 

Girl gangraped: शौचालयासाठी गेलेल्या तरुणीवर स्थलांतरीत मजुरांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

migrant workers staying at quarantine centre gang raped on 18 year old girl in bihar lockdown crime
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार 
  • क्वारंटाईन सेंटरमधन आलेल्या तरुणांनी केला बलात्कार 
  • आरोपी हे स्थलांतरीत मजूर 

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रवासी मजूर आपआपल्या घरी परतत आहेत. याच दरम्यान बिहारमधील रोहतास जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. रात्रीच्या वेळी शौचालयाला गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणीवर दोन प्रवासी मजुरांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर आले आणि...

या प्रवासी मजुरांनी क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर येत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. इतकेच नाही तर या मजुरांनी हे घृणास्पद कृत्य करणअयासाठी गावातील आणखी चार तरुणांना बोलावलं. या चारही तरुणांनी सुद्धा तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी प्रवासी मजुरांना पकडलं 

पीडित तरुणीने सुरेश यादव (२२), विजय यादव (२०), चंचल यादव (२२), मुकेश यादव (२१), चुल्ली पासवान (१८) आणि अमित पासवान (१८) या आरोंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने आरोपींच्या विरोधात गुरुवारी एफआयआर दाखल केली होती. शुक्रवारी सासाराम सदर रुग्णालयात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

गँगरेप नंतर पुन्हा क्वारंटाईन सेंटर 

सामूहिक बलात्कार केल्यानंतर प्रवासी मजूर सुरेश यादव आणि चंचल यादव हे पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये पोहोचले. पोलिसांनी सुरेश आणि चंचल या दोघांनाही अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शेतामध्ये शौचालयाला गेली होती याच दरम्यान आरोपींनी तिला पडलं आणि काही अंतरावर नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

भिंतीवरुन उडी मारून क्वारंटाईन सेंटरच्या बाहेर 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रोहतासचे पोलीस अधिक्षक सत्यवीर सिंह यांनी सांगितले की, सुरेश आणि चंचल हे दोघेही क्वारंटाईन सेंटरमध्ये होते. या दोघांनी फोन करुन गावातील इतर चौघांना बोलावले. पीडित मुलीसोबत घडलेला प्रकार बुधवारी रात्री क्वारंटाईन सेंटरच्या बाहेर घडला. सुरेश आणि चंचल हे दोघेही क्वारंटाईन सेंटरच्या भिंतीवरुन उडी मारून बाहेर पडले होते. पीडिताच्या घरी शौचालय नसल्याने ती रात्री ९.३० च्या सुमारास शेतात शौचालयासाठी आली होती आणि त्यावेळी आरोपींनी तिच्यासोबत हे कृत्य केलं. पीडित मुलीने घडलेला प्रकार घरी जावून सांगितला आणि त्यानंतर तिने आणि  तिच्या कुटुंबाने आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी