अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारतात

India-US 2+2 dialogue 2020 भारत आणि अमेरिका यांच्यातील २+२ या मंत्रीस्तरिय बैठकीसाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ पत्नीसह दिल्लीत दाखल. बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्परही सहभागी होणार.

Mike Pompeo arrives in India for 2+2 Ministerial Dialogue
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारतात  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पत्नीसह भारतात
  • अध्यक्षीय निवडणुकीआधीचा परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओंचा शेवटचा दौरा
  • भारत-अमेरिका यांच्यात BECA करार होण्याची शक्यता, सशस्त्र ड्रोन संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo, Secretary of State) पत्नीसह दिल्लीत दाखल झाले. भारत (India) आणि अमेरिका (United States of America - USA) २+२ या मंत्रीस्तरिय बैठकीच्या निमित्ताने २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत चर्चा करणार आहेत. या बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्परही (Mark Esper, Defense Secretary) सहभागी होतील. भारतासोबतच्या चर्चेनंतर पॉम्पिओ श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांचाही दौरा करणार आहेत. (Mike Pompeo arrives in India for 2+2 Ministerial Dialogue)

याआधी अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात सुरू असलेली लढाई थांबली आहे, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी ट्वीट करुन दिली. दोन्ही देशांनी युद्धबंदीला संमती दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.

Mike Pompeo arrives in India for 2+2 Ministerial Dialogue

हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्यातील सहकार्य वाढावे यासाठी भारत, श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांचा दौरा करत असल्याचे पॉम्पिओ यांनी ट्वीट करुन सांगितले. अमेरिकेत यंदा ३ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेनुसार मतदानातून लोकप्रतिनिधींची निवड होईल. हे प्रतिनिधी अमेरिकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करतील. ही निवडणूक होण्याआधी पॉम्पिओ शेवटचा आंतरराष्ट्रीय दौरा करत आहेत. 

दिल्लीत एस्पर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh, Minister of Defence of India / Raksha Mantri) आणि पॉम्पिओ भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar, External Affairs Minister) यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्री काही मुद्यांवर संयुक्तपणेही चर्चा करण्याची शक्यता आहे. या चर्चेत मलबार युद्धाभ्यासाबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 

अलिकडेच जपानमध्ये चतुष्कोनी (चतुर्भुज) सुरक्षा संवादाचे अर्थात क्वाडचे (Quadrilateral Security Dialogue - QSD or QUAD) सदस्य असलेल्या भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची एक बैठक झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचा प्रभाव अमेरिका आणि भारत यांच्या २+२ या मंत्रीस्तरिय बैठकीवर राहण्याची शक्यता आहे. 

भारताने अमेरिकेसोबत २००२ मध्ये जनरल सिक्युरिटी ऑफ मिलिट्री अॅग्रीमेंट (General Security of Military Information Agreement - GSOMIA), २०१६ मध्ये लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट (Logistics Exchange Memorandum of Agreement - LEMOA) तसेच २०१८ मध्ये कम्युनिकेशन्स, कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अॅग्रीमेंट (Communications, Compatibility and Security Arrangement - COMCASA) केले आहे. दोन्ही देशांमध्ये २०१९ पासून बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंट (Basic Exchange and Cooperation Agreement for Geo-Spatial Cooperation - BECA) संदर्भात चर्चा सुरू आहे. या कराराआधारे भारताला अमेरिकेकडून अॅडव्हान्स सॅटेलाइट अँड टोपोग्राफिकल डेटा मिळणार आहे. भारताचे सामर्थ्य वाढवणाऱ्या या करारावर मंत्रीस्तरिय बैठकीच्या वेळी दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री स्वाक्षऱ्या करण्याची शक्यता आहे.

करार झाल्यास अमेरिका भारताला लाँग रेंज नेव्हिगेशन आणि मिसाइल टारगेटिंग यासाठी अॅडव्हान्स सॅटेलाइट अँड टोपोग्राफिकल डेटा (advanced satellite and topographical data for long-range navigation and missile-targeting) देणार आहे. ही माहिती मिळाल्यामुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेत आणखी वाढ होईल. क्षेपणास्त्र हल्ले आणि लढाऊ विमानांद्वारे अचूक हल्ले करण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळाल्यामुळे भारताच्या सामर्थ्यात भरपूर वाढ होणार आहे. कराराचा पाकिस्तानला सर्वात मोठा फटका बसणार आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण सिद्धतेची माहिती अमेरिकेकडे आहे. ही माहिती भारताच्या हाती येणार आहे. अमेरिका भविष्याचा विचार करुन भारतासोबतचे सहकार्य वाढवण्यासाठी ही सर्व माहिती भारताला देणार आहे. चीनविषयी अमेरिकेच्या उपग्रहांनी संकलित केलेली माहितीही भारताला मिळेल. मात्र चीनविषयी अमेरिकेकडे जेवढी माहिती आहे त्यापेक्षा कैकपट जास्त अचूक माहिती पाकिस्तानविषयी आहे. पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेच्या प्रत्येक घडामोडीवर रिअल टाइम लक्ष ठेवणारी यंत्रणा अमेरिकेकडे आहे. अफगाणिस्तानवरील लष्करी कारवाईच्या निमित्ताने अमेरिकेला हे शक्य झाले आहे. या माहितीचा सर्वाधिक फायदा भारताला एका समस्येवर मात करण्यासाठी होईल तर चीनविरोधातल्या माहितीमुळे भारताच्या सामर्थ्यात वाढ होईल.

भारताचा प्रयत्न अमेरिकेसोबत करार करुन बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यासाठी सक्षम असलेल्या सशस्त्र ड्रोनची मोठी खरेदी करण्याचा आहे. हा हेतू साध्य झाल्यास भारतासाठी अमेरिकेच्या मंत्र्यांचा दौरा सर्वाधिक लाभाचा दौरा ठरेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी